कलापथकांच्या माध्यमातून नागरिकांना दिली जाणार शासनाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
कलापथकांच्या माध्यमातून नागरिकांना दिली
जाणार
शासनाच्या विविध योजनांची माहिती
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
लातूर दि.8(जिमाका):- राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण
झाले आहेत. या दोन वर्षात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत.
या योजनांची अधिकची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, यासाठी लातूर जिल्हा माहिती
कार्यालयाच्यावतीने कलापथकांच्या माध्यमातून
गावोगावी नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.
हे कलापथक लातूर , रेणापूर , औसा , निलंगा, शिरूर
अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर
तालुक्यातील जेथे मोठे आठवडी बाजार भरतात, तिथे व गर्दीच्या ठिकाणी महाआवास योजना, महिला कल्याण,
इतर पथदर्शी प्रकल्प व यासह विविध विकास योजनांची कलापथकांच्या माध्यमातून माहिती दिली
जाणार आहे, याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने
करण्यात आले आहे.
0000
Comments
Post a Comment