जिल्‍हयातील नगरपरिषद / नगरपंचायतीमधील पात्र अनुकंपा धारकांना जिल्‍हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे हस्‍ते नियुक्‍ती आदेश

 

जिल्‍हयातील नगरपरिषद / नगरपंचायतीधील पात्र अनुकंपा धारकांना जिल्‍हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांचे हस्‍ते नियुक्‍ती आदेश

 

लातूर,दि.16(जिामाका):- शासन निर्णयान्वये दिनांक.22ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णय व परिपत्रकान्‍वये राज्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजने संदर्भातील सुधारीत शासन निर्णय लागू करण्यात येऊन अनुकंपाची प्रतिक्षासुची ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदा/नगरपंचायती मुख्याधिकारी यांना त्यांच्या कार्यालयाकडील अनुकंपा नोंदवहीमध्ये नोंदविलेल्या उमेदवारांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेले होते.

लातूर जिल्ह्यातील नगरपरिषदा/नगरपंचायतीमधील मुख्याधिकारी यांनी कळविल्या नुसार जिल्‍हास्‍तरावर नगर परिषद प्रशासन विभागाची संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुकंपाची अंतिम प्रतिक्षासुची ठेवण्‍यात येवून जिल्‍हास्‍तरावर नगर परिषद प्रशासन विभागाची संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुकंपाची अंतिम प्रतिक्षासुची ठेवण्‍यात आलेली आहे. संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुकंपाच्या प्रतिक्षा यादीवरील वर्ग-तीन मधील चार उमेदवार व वर्ग- चार चे दोन उमेदवारांना लातूर जिल्‍ह्यातील नगर परिषदा/ नगर पंचायती मधील रिक्‍त पदावर विहीत अटी व शर्तीच्‍या अधिन राहून सेवा जेष्ठतेनुसार दुस-या टप्प्याअंतर्गत नेमणूक देवून आदेशाचे वितरण जिल्‍हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी., यांच्या हस्‍ते करण्‍यांत आले.

लातूर जिल्‍ह्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजने संदर्भातील सुधारीत शासन निर्णय लागू करून सलग दोन वर्षे अनुकंपाची नियुक्‍ती देण्‍याचे जिल्‍हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्‍या मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात आले आहे. लातूर जिल्‍हा हा जिल्‍ह्यातील नगरपरिषदा / नगरपंचायतींमधील पात्र अधिकारी/कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ देण्या बाबत मराठवाड्यात एकमेव जिल्‍हा ठरला आहे.

या प्रसंगी जिल्हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी., यांनी सर्व संबंधित कर्मचारी यांचे अभिनंदन करून यावेळी या अनुकंपा नियुक्‍तीचे काम त्‍वरीत केल्‍याबद्दल नगर परिषद प्रशासन शाखा जिल्‍हा सह आयुक्‍त सतिश शिवणे, लातूर व कर्मचारी सुनिल शेळके, नितीन ढोणे, बालाजी कोळी यांची प्रशंसा करून अभिनंदन केले.

तसेच लाभार्थी अनूकंपा धारकांनी  जिल्हाधिकारी पृथ्‍वीराज बी.पी., लातूर यानी अनुकंपा नियुक्‍ती प्रक्रिया पुर्ण केल्‍याबद्दल सत्‍कार करून आभार मानले. व नगर परिषद प्रशासन शाखा जिल्‍हा सह आयुक्‍त लातूर यांनी शेवटी उपस्थितांचे आभार मानले.



 

                                         00

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत