मल्लिकार्जुन देवस्थान साकोळला सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून नोटीस
मल्लिकार्जुन देवस्थान साकोळला
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून नोटीस
लातूर,दि.16(जिामाका):- मौ.साकोळ ता.शिरुर अनंतपाळ, जिल्हा लातूर परिसरातील सर्व ग्रामस्थांना
या नोटिसीव्दारे कळविण्यात येते की, श्री. मल्लिकार्जुन देवस्थान साकोळ या मंदीराची
नोंदणी या कार्यालयात दि.21 सप्टेंबर 2021 रोजी झाली असुन त्याचा नोंदणी क्र.ए-2091
(लातूर) असा आहे. सदर न्यासास आजमितीला कोणतीही योजना मंजूर नसून सदर न्यासाच्या सुरळीत
कारभाराकरीता योजना मसुदा तयार करणे गरजेचे आहे.
योजना
मंजुरी संदर्भात आपल्यापैकी कोणास प्रस्ताव दाखल करावयाचा असल्यास अथवा योजनेबाबत काही
सांगावयाचे असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन 30 (तीस) दिवसाच्या आत या कार्यालयात
समक्ष हजर रहावे. या कालावधीत कोणताही प्रस्ताव न आल्यास कार्यालयीन स्तरावर योजना
मसुदा तयार करण्याची कारवाई सुरु केली जाईल असे अधिक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय,
लातूर विभाग लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment