आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करावेत
आपले
सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करावेत
लातूर,(जिमाका)
दि.21:-लातूर जिल्ह्यातील ज्या कार्यक्षेत्रात आपले सेवा
केंद्र स्थापीत आहेत त्या बाबतची माहिती या कार्यालयामार्फत प्रपत्र अ मध्ये प्रसिध्द
करण्यात आलेली आहे. रिक्त असलेल्या कार्यक्षेत्रात दिनांक 23 मार्च 2022 ते 6 एप्रिल
2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातील इच्छुक अर्जदार यांनी रिक्त असलेल्या कार्यक्षेत्रात
आपले सरकार सेवा केंद्रासाठी कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावेत असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज
बी.पी. यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले
आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान
विभाग व सामन्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय
ई- गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकापर्यंत
शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे
हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात
व तसेच महानगर पालिका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा
उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.
आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी व शर्ती
पूढील प्रमाणे आहेत.- आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक
19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक
आहे. या शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रमाणे आपले
सरकार सेवाकेद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र मंजूर ठिकाणीच
चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल.
नागरीकांकडून स्वकारण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी ई-सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात, डिजिटल
पेमेंटला प्राधान्य देणे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा
केद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे.
शासनाने ठरवून दिलेल्या कॉमन ब्रॅडींगचा
वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन
क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे. शासनाने
ठरवून दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा
अधिक शुल्काची आकारणी न करणे. शासनाने पुरविलेल्या वस्तू आज्ञावली इ. चे वापर संरक्षण
जतन करणे. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे. विविध
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकारेपणे पाळणे.
ज्या अर्जदारांकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारांनी CSC ID काढणे आवश्यक आहे.आपले सरकार
सेवा केद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील
अर्ज दिनांक 6 एप्रिल 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात.
000
Comments
Post a Comment