बालगृहातील मतीमंद अनाथ मुलाचा शोध सुरु

 

बालगृहातील मतीमंद अनाथ मुलाचा शोध सुरु

 

        लातूर,दि.10(जिमाका):- संत गाडगेबाबा अनाथ मतीमंद मुलाचे बालगृह येथील मुलगा नांव - राधे वय - 17 वर्षे 10 महिने 19 दिवस वय असून बागृहाचे सफाईगार पापामियाँ साहेबलाल शेख व निलेश सुभाष क्षिरसागर यांनी प्रात विधीसाठी व इतर कामासाठी बालग्रहाचा दरवाजा उघडून बालग्राहाची साफसफाई करत असताना बालगृहातील मतीमंद अनाथ मुलगा याने त्यांची नजर चुकवून बालगृहाचे बाहेर गेला व तो बालगृहात परत आलेला नाही. विवेकानंद पोलीस स्टेशन बालगृहाच्या आजुबाजूच्या परीसरात, आजू बाजूच्या गावात, लातूर शहरात शोध घेतला परंतू तो मिळून आलेला नाही. त्यास कोणीतरी अज्ञात कारणासाठी पळवून नेले असावे.

         याबाबत विवेकानंद पोलीस स्टेशन लातूर येथे फिर्यादी नामे सचिन वसंत खिल्लारी वय-31 वर्षे व्यवसाय - नौकरी रा. टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि. अहमदनगर ह.मु. संत गाडगेबाबा अनाथ मतीमंद मुलाचे बालगृह, नवीन कातपूर रोड, लातूर यांनी पोलीस स्टेशन येथे अर्ज केला आहे.

           त्यानुसार विवेकानंद चौक लातूर येथील पोलीस स्टेशन येथे 136/2022 कलम 363 भादवि प्रमाणे दिनांक 1 मार्च, 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्यात तपास करण्यात येत आहे, असे लातूर विवेकानंद चौक पोलीस स्टेशनचे  पोलीस उप -निरीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                        0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे प्रवेश अर्ज भरुन सादर करावेत