अनुसूचित जाती व नाबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत -सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन

 

अनुसूचित जाती व नाबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत

-सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आवाहन

        लातूर दि. 10(जिमाका):- अनुसूचित जाती व नाबौध्द घटकांच्या स्वंयसहाय्यता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी देण्याकरीता 25 मार्च 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत. तरी अनुसूचित जातीच्या जास्तीत जास्त बचत गटांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लातूर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण एस. एन. चिकुर्ते, एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. तसेच सर्व कागदपत्रासह अर्ज परिपूर्ण भरुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुनी डालडा फॅक्ट्री, गुळ मार्केट, लातूर येथे सादर करावेत. 

         अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या स्वंयसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. स्वंयसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत.  स्वंयसहाय्यता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा  3.50 लाख इतकी राहील.

        स्वंयसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनाच्या किंमतीच्या 10 टक्के स्वहिस्सा भरल्या नंतर प्रत्यक्ष किंमतीच्या 90 टक्के (कमाल रु. 3.15 लाख ) शासकिय अनुदान अनुज्ञेय राहील.

                लाभार्थी स्वंयसहाय्यता बचत गटांनी या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या किमान 9 ते 18 अश्वशक्ती पेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल, मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15 लाख) पेक्षा जादा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजने अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना (रु. 3.15 लाख) पेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचत गटाने स्वत:खर्च करावी.

       स्वंसहाय्यता बचत गटाने राष्ट्रीयकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते उघडावे व सदरचे बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांचे अधार क्रमांशी संलग्न करावे.

                स्वंयसहाय्य बचत गटाच्या उद्दिष्टापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास निवड लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. स्वंयसहाय्यता बचत गटाने मिनी टॅक्टर व उपसाधने खरेदी केल्याचे पावती सादर केल्यानंतर व त्याची खातर जमा करुन लाभार्थी बचत गटाला शासकिय अनुदान 50 टक्के हप्ता त्याच्या बचत गटाच्या आधार सलग्न खात्यावर जमा करण्यात येईल.

          उर्वरीत 50 टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आर.टी.ओ. कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. किंवा स्वंयसहाय्यकता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने याची आर.टी.ओ. कार्यालयाकडे पुरावे सादर केल्यास 100 टक्के अनुदान स्वंयसहाय्यता बचत गटाच्या खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच ज्या बचत गटानी या पूर्वी कार्यालयास अर्ज सादर केलेला आहे. अशा बचत गटानी पुनश्च: अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

        

0000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु