सोयाबीन टोबण पद्दत ठरते आहे परिणामकारक ; लातूर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन टोबण पद्दतीने
सोयाबीन टोबण पद्दत ठरते आहे परिणामकारक ; लातूर जिल्ह्यात 20 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन टोबण पद्दतीने लातूर दि.29 (जिमाका ) लातूर जिल्ह्यात या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र विक्रमी वाढले असून या वर्षी 4 लाख 77 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे. हे प्रमाण गेल्या वर्षी 4 लाख 59 हजार हेक्टर एवढे होते. कृषी विभागाने सोयाबीनचा वाढता पेरा लक्षात घेऊन अधिक उतारा यावा म्हणून वाफ्यावर टोबण करण्याचा प्रचार आणि प्रसार केला त्यामुळे यातील 20 हजार हेक्टरवर टोबण पद्दतीने किंवा बी बी एफ पद्दतीने लागवड झाली आहे. त्याचा गेल्यावर्षी उत्तम परिणाम दिसून आल्यामुळे यावर्षी याकडे लोकांचा ओढा वाढला असल्याची माहिती जिल्ह्याचे कृषी अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. शिवार फेरीवर असताना ते बोलत होते. लातूर जिल्हा देशातील सोयाबीन उत्पादनाचे हब असल्यामुळे देशातील सोयाबीनचे भाव लातूरचा कृषी बाजार ठरवतो. लातूरला सोयाबीनवर प्रक्रिया करणारे उद्योग असल्यामुळे सोयाबीनला सर्वाधिक उठाव लातूर मध्ये आहे. यावर्षी लातूर जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र पाच लाख 71 हजार हेक्टर आहे. त्यातले तब्बल ...