लातूर जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयात येत्या 13 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत

 

लातूर जिल्ह्यातील संबंधित तहसील कार्यालयात

येत्या 13 जुलै रोजी जिल्हा परिषदेचे आरक्षण सोडत

 

 *लातूर,दि.6,(जिमाका)* मा.राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांच्या दिनांक - 05 जूलै २०२२ रोजीच्या आदेशान्वये अन्‍वये दिलेल्‍या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्‍हयातील जिल्‍हा परिषद व त्‍याअंतर्गत असलेल्‍या सर्व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणुका-2022 साठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. सदरील कार्यक्रमानुसार जिल्‍हा परिषदेची आरक्षण सोडत डी.पी.डी.सी.हॉल, नविन जिल्‍हाधिकारी कार्यालय, लातूर येथे दिनांक 13 जूलै 2022 रोजी दुपारी 12.00 वा. काढण्‍यात येणार आहे.

 पंचायत समिती रेणापूर, अहमदपूर, उदगीर, निलंगा, शिरुरअनंतपाळ, जळकोट व देवणी करीता आरक्षण सोडत संबंधित तहसिल कार्यालयामध्‍ये दिनांक 13 जूलै 2022 रोजी दुपारी 12.00 (निलंगा साठी दुपारी 3.00 वा. व देवणीसाठी सकाळी 11.00 वा) काढण्‍यांत येणार आहे.

त्‍याचप्रमाणे पंचायत समिती लातूर करीता जुने डी.पी.डी.सी.सभागृह, प्रशासकीय इमारत, शिवाजी चौकाजवळ, लातूर येथे, पंचायत समिती औसा करीता मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील मिटींग हॉल, औसा येथे, पंचायत समिती चाकूर करीता पंचायत समिती सभागृह, चाकूर येथे दिनांक 13 जूलै 2022 रोजी दुपारी 12.00 वा.आरक्षण सोडत काढण्‍यात येणार आहे.

जिल्‍हा परिषद व पंचायत समितीकरीता आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्‍द करावयाचा दिनांक- 15 जूलै 2022 असा असून त्‍यावर हरकती व सुचना जिल्‍हाधिकारी/संबंधित तहसिलदार यांच्याकडे दिनांक 15 जूलै 2022 ते 21 जूलै 2022 या कालावधीत दाखल करता येतील.     

       जिल्‍हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्‍या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्‍या सभेस हजर राहण्‍याची इच्छा आहे, त्‍यांनी वरील ठिकाणी व वेळी हजर राहावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा