भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जातील माहिती भरण्याचे आवाहन

 

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती अर्जातील

माहिती भरण्याचे आवाहन

       

*लातूर,दि.21(जिमाका):-*भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष सन         2021-22 करीता महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत केलेले असून महाडीबीटी    पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहिती थेट केंद्र शासनाच्या NSP पोर्टलवर सादर करण्यात येते.

यामध्ये अद्यापही काही विद्यार्थ्यांचे आधार संलग्निकृत मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याचे निदर्शनास आले असून तशी महाविद्यालये व विद्यार्थ्यांची यादी सहायक आयुक्त कार्यालयातून घेऊन तात्काळ विहीत एक्सेल शीटमध्ये पिवळा रकाना क्र. N मध्ये विद्यार्थ्यांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालय स्तरावरुन तात्काळ सूचना देण्यात याव्यात.

तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरीता पुढील गैरसोय टाळण्यासाठी आधार क्रमांक तसेच बँक खात्याशी विद्यार्थ्यांचे क्रमांक संलग्न करणे बाबत सूचना देण्यात यावे असे आवाहन सहायक आयुक्त्‍ समाज कल्याण लातूर शिवकांत चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                       0000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा