सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-1) ऑनलाईन 30 जूलै पूर्वी सादर करावेत
सर्व शासकीय / निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी
त्रैमासिक विवरणपत्र (ईआर-1) ऑनलाईन 30 जूलै पूर्वी सादर करावेत
लातूर,दि.25,(जिामाका):- सर्व शासकीय व खाजगी आस्थापना कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1 प्रत्येक तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत ऑनलाईन सादर करणे सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसुचित करणारा अधिनियम (Compulsory Notifcation of Vacanies Act), 1959 व त्याअंतर्गत नियमावली 1960 नुसार बंधनकारक असल्याने विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र व राज्य शासन, अंगिकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना ईआर-1 विवरणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नियोक्त्यांच्या लॉगइन मध्ये ईआर-1 सादर करताना पोर्टलवर एम्प्लॉयर (लिस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉगइन मध्ये युजर आयडी व पासवर्ड वापरुन लॉगईन करुन डॅशबोर्डवरील ईआर-1 ऑप्शनवर क्लीक करावे व तदनंतर एंटर ईआर-1 वर क्लीक करुन तिमाही विवरणपत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करता येईल.
याचा वापर करुन 30 जुलै 2022 पुर्वीच ईआर-1 विवरणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.सदर विवरणपत्र सादर करताना काही तांत्रिक अडचण आल्यास 02382- 245183 क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात नमूद केले आहे.
000
Comments
Post a Comment