केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करण्यासाठी प्रति हेक्टरी 30 हजार अनुदान

 

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानातंर्गत वैरणीसाठी शेवगा

लागवड करण्यासाठी प्रति हेक्टरी 30 हजार अनुदान

 

*लातूर,(जिमाका)दि.19:-* केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत  वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसुचित  जाती उपायोजना)  या करिता प्रती हेक्टरी रु. 30 हजार प्रती लाभार्थी अनुदान उपलब्ध  करुन देण्यात येणार आहे.

          सदर योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी पशुपालकांना वैरणी करिता शेवगा लागवड करण्यासाठी  अनुदान वितरीत करण्यात येणार आहे प्रति हेक्टर 7.5 किलो शेवगा ( पीकेएम) देण्यात येणार आहे.

        बियाणांची किंमत रु. 6 हजार 750 व उर्वरित अनुदान 23 हजार 250 असे एकुण रु. 30 हजार दोन टप्प्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे बियाणाची थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असुन, उर्वरित अनुदानातुन जमिनीची मशागत व लागवड , खतांची व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.

          या योजने करीता इच्छुक असणा-या  अनुसूचित जाती प्रवर्गातील पशुपालक शेतकरी यांनी दिनांक 21 जूलै 2022 पासुन दिनांक 11 ऑगस्ट 2022 पर्यत अर्ज सादर करावेत. सदरील  अर्ज संबंधीत तालुक्याच्या पशुधन विकास  अधिकारी (विस्तार) पंचायत समिती  आणि  नजीकच्या  पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -1/2 यांचेकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ,लातुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                          0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु