मुलींना चुली समोर न बसवता शाळेत पाठवा - न्या.एस.डी.अवसेकर

 

मुलींना चुली समोर न बसवता शाळेत पाठवा

-         न्या.एस.डी.अवसेकर

 

     


*लातूर,दि.8,(जिमाका)*
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,लातूर यांच्या मार्फत महाराणा प्रताप नगर लातूर येथे मुलांचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 या विषयी जागरुकता शिबीराचे आयोजन करण्यात आले.

     या वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्या. एस.डी. अवसेकर, यांनी उपस्थित पालकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले व मुलींना घरात चुलीसमोर न बसवता त्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवा या बाबत सांगितले. शिक्षणाचा अधिकार या बाबत त्यांनी पालकांना व बालकांना सविस्तर माहिती दिली.

         ॲड. छाया आकाते यांनी बालकांचे अधिकार या विषयाबाबत माहिती सांगितली. ॲड. अंजली जोशी यांनी लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 या बाबत माहिती दिली.ॲड. बिना कांबळे यांनी महिलांचे हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले.

        या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत, लातूर यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वहया व पेन वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विधी स्वंयसेवक इस्माईल शेख, दिक्षा लांडगे, मंजुश्री पाटील व रजिया सय्यद यांनी परिश्रम घेतले.

                                                          ****

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु