मांजरा नदी दुतर्फा वृक्ष लागवड मोहिम, 21 जुलै रोजी लातूर मध्ये भव्य रॅली, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा

 

*मांजरा नदी दुतर्फा वृक्ष लागवड मोहिम, 21 जुलै रोजी लातूर*

*मध्ये भव्य रॅली, नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा*

*- जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांचे आवाहन*

           *लातूर दि.20(जिमाका)* लातूर जिल्हा हा  सर्वात कमी वृक्षाच्छादित क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात मोडतो,  त्यामुळे येणाऱ्या काळात हे क्षेत्र झपाटयाने वाढावे म्हणून जिल्हा प्रशासन याची सुरुवात 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी पाच किलोमीटर मानवी साखळी करून मांजरा नदीच्या दुतर्फा 28 हजार वृक्ष लागवड करणार आहे. त्यासंदर्भातील जनजागृती रॅली दि. 21 जुलै रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी 7.30 वाजता सुरु होऊन छत्रपती शिवाजी चौक ते गांधी चौकाला वळसा घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे समारोप होईल. यासाठी शहरातील अधिकाधिक नागरिकांनी या वृक्ष लागवड जनजागृती रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

              आज जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील सर्व महाविद्यालये, शाळा, विविध स्वयंसेवी संस्था, मांजरा नदी काठावरील गावचे सरपंच, शासकी





य अधिकारी, कर्मचारी यांची आढावा बैठक घेतली, त्यावेळी हे आवाहन केले.

            मांजरा नदीच्या काठावरील ज्या गावात वृक्षारोपण होणार आहे, तेथेही 21 जुलै रोजी सकाळी 7.30 वाजता विद्यार्थी, शिक्षक, नागरिक यांच्या सहभागाने प्रभात फेरी होणार आहे. ही वृक्षारोपण जन चळवळ व्हावी यासाठी लोकांचा सहभाग आवश्यक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावात कमीत कमी अडीच हेक्टर क्षेत्रात ऑक्सिजन पार्क होणार असून त्यासाठी  जिल्हा प्रशासन आग्रही असल्याचेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी सांगितले.

000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा