साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची शैक्षणिक वर्ष 2021-22 ची शिष्यवृत्ती योजनेसाठी 22 जूलै पर्यंत अर्ज सादर करावेत

 

साहित्यरत्न  लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची शैक्षणिक वर्ष 2021-22 ची शिष्यवृत्ती योजनेसाठी 22 जूलै पर्यंत अर्ज सादर करावेत*

          *लातूर, (जिमाका) दि.13:- साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग समाजातील मांग, मातंग,मिती मादीग, मादींगा, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मादगी, मादगी, माहिगा या 12 पोट जातीतील सन 2021-22 मधील शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या व सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी उत्तीर्ण विद्यार्थी / विद्यार्थीनी यांना कळविण्यात येते की, सन 2022-23 मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणानुक्रमे प्रथम तीन ते पाच विद्यार्थ्यांना निधीच्या उपलब्धतेनुसार साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती सन 2022 मध्ये दिली जाणार आहे.

        तरी पात्र उमेदवारांनी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, डाल्डा फॅक्टरी, शिवनेरी गेट समोर, लातूर येथे पूढील कागदपत्रासह दि. 22 जूलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा व्यवस्थापक, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

        या सोबत जातीचा दाखला, (छायांकित प्रत), रेशन कार्ड (छायांकित प्रत), आधार कार्ड (छायांकित प्रत), शाळेचा दाखला (छायांकित प्रत), मागील वर्षाचे (सन 2021) गुणपत्रीकेची छायांकित प्रत, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती (छायांकित प्रत), व दोन पासपोर्ट फोटो आवश्यक आहे.

                                                             000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु