औसा
तालुक्यातील भुसणी येथील
अवैध मद्य निर्मिती विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई....
51 लाख 63 हजाराचा 550 रुपयांचा मुद्येमाल जप्त
*लातूर,दि.27(जिमाका):-* राज्य
उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक सुनिल चव्हाण यांनी दिलेल्या
निर्देशानुसार व विभागीय उप-आयुक्त प्रदिप एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर
जिल्ह्यातील अधीक्षक अभिजित देशमुख यांनी भरारी पथक, उस्मानाबाद / लातूर यांच्या स्टाफ
व लातूर स्टाफ समवेत यांनी कृष्णार्जुन ॲग्रो इंडिस्ट्रिज अँड वेअर हाऊस, भुसणी शिवार,
हासेगांव रोड, भुसणी, ता. औसा, जि. लातूर या
ठिकाणी दिनांक 26 जूलै, 2022 रोजी छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना
बनावट देशी मद्याचे निर्मिती व त्यासाठी लागणारे स्पिरीट (मद्यसार) ची वाहतूक व विक्री
करण्याच्या उद्येशाने बाळगून असतांना मिळून आला.
सदर गुन्ह़यामध्ये 200 ली. क्षमतेचे 39 प्लॅस्टीक
बॅरल ज्यात 7800 ली. स्पिरीट फेलवर (इसेंस)
, 20 बॉक्स टोपण (बुचे) एकबॉटलींग (सिलींग व पॅकींग) मशीन, पाणी फिल्टर मशीन, ब्लेंड
मिक्सींग मशीन, विविध बँडचे लेबल, अल्कोहोल मिटर, मेंजरींग टयुब, 180 मिली काचेच्या
बाटल्या, 90 मिली प्लॅस्टीक बाटल्या, पाणी मोटर, रिकामे कार्टून बॉक्स, 200 ली. क्षमतेचे
सिंटेक्स टाक्या, 500 ली क्षमतेचे सिंटेक्स टाक्या, पॅकींग स्लीप, दोन मोबाईल, इरटिका चारचाकी वाहन क्र.
MH-12-HZ-6102, एक अशोक ले-लँड चारचाकी कंटेनर क्र. MH-4-EM-8450, एक टाटा चारचाकी
ट्रक क्र. MH-40-BL-8407 असा एकूण 51 लाख
63 हजार 550 रुपये इतका अवैध मुद्येमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्ह़यामध्ये रविकुमार शिवपुजन गुप्ता, वय 27 वर्षे, रा. कानपुर
तालुका, उत्तरप्रदेश आणि ज्ञानेश्वर बाबुसिंग राजपुत, वय-45 वर्षे रा.दहिंदुले, ता.
पातोंडा, जि. नंदुरबार यांना अटक करण्यात आली.
या कारवाईमध्ये अधीक्षक - अभिजित
देशमुख, भरारी पथक निरीक्षक - टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक-पी. जी. कदम, सचिन
शेटे, आर. ए. घोरपडे, जवान-महेश कंकाळ, विशाल चव्हाण, राजेश गिरी, एजाज शेख तसेच लातूर निरीक्षक- आर. एम. बांगर,
दुय्यम निरीक्षक- एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनिरुद्व देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष
केंद्रे, सुरेश काळे यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास भरारी पथक,
उस्मानाबाद / लातूर निरीक्षक- टी.एस. कदम हे करित आहेत.
अवैध मद्यविक्री विरोधात कारवाई यापुढेही चालु राहणार असून, अवैध मद्याबाबत
माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक व या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल
असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अभिजित
देशमुख यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन
एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0000
Comments
Post a Comment