जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी

मतदार यादी कार्यक्रम जाहीर

 

          लातूर,दि.11 (जिमाका):- मा. राज्‍य निवडणूक आयोग महाराष्‍ट्र यांचे दिनांक 06 जूलै 2022 रोजीच्या आदेशा अन्‍वये लातूर  जिल्ह्यातील जिल्‍हा परिषद व त्‍यांअतर्गत असलेल्‍या पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्‍याचा कार्यक्रम दिलेला आहे. सदरील कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. 

            निवडणुकीचा टप्पा व टप्पा सुरु करण्याची / पुर्ण करण्याची तारीख पूढील प्रमाणे आहे.मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, राज्‍य निवडणुक आयोगाने अधिसुचि‍त केलेल्‍या तारखेस अस्तित्‍वात असलेल्‍या विधानसभेच्‍या मतदार यादीवरुन जिल्‍हा परिषद व पंचायत समित्‍यांच्‍या सार्वत्रिक निवडणुकीकरीता तयार केलेली मतदार यादी हरकती व सुचना मागविण्‍याकरीता प्रसिध्‍द करण्‍याचा दिनांक 18 जूलै 2022, मतदार यादीसंदर्भात हरकती व सुचना दाखल करण्‍याचा अंतिम दिनांक 22 जूलै 2022, निवडणुक विभाग व निर्वाचक गणाच्‍या छापील मतदार यादया अ‍धिनियमाच्‍या कलम 13 खाली अधिप्रमाणित करण्‍याची तारीख 29 जूलै 2022, निवडणुक विभाग व निर्वाचक गणांच्‍या छापील मतदार यादया माहितीसाठी ठेवण्‍यात आल्‍या आहेत, याबाबतची सुचना प्रसिध्‍द करण्याची तारीख 29 जूलै 2022 व मतदान केंद्राची यादी व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करणे दि. 08 ऑगस्ट 2022 असा आहे.

वरील मतदार यादी कार्यक्रम राबविणेसाठी त्‍या-त्‍या तालुक्‍याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्‍यांत आलेले आहे व नियंत्रण अधिकारी म्‍हणुन संबंधित उपविभागीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु