मधमाशा पालन मोफत प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे आवाहन

 

मधमाशा पालन मोफत प्रशिक्षणासाठी

अर्ज करण्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे आवाहन

       *लातूर दि.14(जिमाका):- महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, मंत्रालय मुंबई-32 यांचा शासन निर्णय क्र. केव्हिबी 2017/प्र.क्र.-16 उद्योग -6 दिनाक 18 जुन 2019 अन्वेय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे.मधमाशा पालन मोफत प्रशिक्षणासाठी पूढील प्रमाणे  या करीता पात्र व्यक्ति / संस्थाकडून अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

योजनेची वैशिष्टे :- मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वारुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वंगुतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवंर्धनाची जनजागृती ही या योजनेची वैशिष्टये आहेत.

योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता :-

वैयक्तिक माधपाळसाठी :-पात्रता:- अर्जदार साक्षर असावा स्वतांची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.

केंद्रचालक प्रगतिशिल मधपाळ - व्यक्ति पात्रता पूढील प्रमाणे आहे :- किमान 10 वी पास वर्ष 21 पेक्षा जास्त असा व्यक्तिच्या नांवे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुबातील कोणत्याही व्यक्तिच्या नांवे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भांडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोंकांना प्रशिक्षण देण्यांची क्षमता व सुविधा असावी.

केंद्रचालक संस्थासाठी- पात्रता :- संस्था नोदणीकृत असावी संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची /भाडयाने घेतलेली असावी  संस्थेकडे मघमाशा पालन प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण  देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत.

लाभार्थि निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास  बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील.  मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, या अटी व शर्ती असणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क - जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र एम.आय.डी. सी. एरिया लातुर   दुरध्वनी क्रमांक 02382-2220144 या क्रमांकावर संपर्क साधावा असे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  यांच्याशी अधिक माहितीसाठी  संपर्क साधावा असे एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा