राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम स्थगित

 

राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम स्थगित

 

        *लातूर,दि.14(जिमाका):-*राज्य निवडणूक आयोगाचे दि. 8 जुलै 2022 रोजीच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूका कार्यक्रम -2022 दिला होता. तो स्थगित करण्यात आला आहे.

          मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका क्रमांक 19756/2021 ची सुनावणी दि. 12 जुलै 2022 रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागसप्रवर्गाबाबत दिलेला अहवाल मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मा. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भातील  पुढील सुनावणी दि. 19 जुलै 2022 रोजी ठेवलेली आहे.

           सदर पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, आयोगाने दि. 8 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेला राज्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतींमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम -2022 याव्दारे स्थगित करण्यात येत आहे.

        सदर निवडणूकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, या बाबीस आपल्या स्तरावरुन योग्य ती प्रसिध्दी देण्यात यावी. निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे वरील सर्व क्षेत्रात जाहीर करण्यात आलेली आचार संहिता आता लागू राहणार नाही. मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार असे राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव संजय सावंत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                   0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु