धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना* *अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2022-23

 

धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना* *अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2022-23

 

        *लातूर,दि.5,(जिमाका)-* अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 07 ऑक्टोबर 2015 अन्वये राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना राबविण्याबाबत अल्पसंख्यांक विकास विभाग, परिपत्रक जा.क्र.अविवि-2022/ प्र.क्र.40/ का.6 दि. 15 जून 2022 अन्वये कळविण्यात आले आहे.

    त्याअनुषंगाने संस्था चालकांनी या योजनेअंतर्गतचे प्रस्ताव दिनांक 07 ऑक्टोबर 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात रितसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या कार्यालयात दि. 31 जूलै 2022 दुपारी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. असे जिल्हा नियोजन अधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                       000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा