योजना- देवणी गोवंश संवर्धन 2022-23 मार्गदर्शक सुचना
योजना- देवणी गोवंश संवर्धन 2022-23
मार्गदर्शक सुचना
*लातूर
दि.14(जिमाका):-* सन-2022-23 करीता देवणी गोवंश संवर्धनासाठी जिल्हा परीषद
उपकर योजनेतुन जिल्हातील जास्तीस्तं जास्त दूध उत्पादन देणा-या देवणी जातीच्या गाईचे
संवर्धन करण्यासाठी सदर योजनेची अमंलबजावणी करण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये जिल्हयातील
प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या गायींची दुग्धस्पर्धा आयोजीत करण्यात येणार
आहे. या योजनेसाठी पूढील प्रमाणे मार्गदर्शक सूचना असतील.
प्रत्येक तालुक्यामध्ये देवणी जातीच्या किमान 6 लीटर
प्रती दिन पेक्षा जास्त दुध देणा-या गाईच्या पशुपालकाना यामध्ये सहभागी होता येईल.
सदर दुग्धस्पर्धा मध्ये देवणी जातीच्या जातीवंत गुणधर्म असलेल्याच गायींची दुग्धस्पर्धा
वर्षातुन 3 वेळा वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. दुग्ध स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या गाईची
(INAPH) प्रणालीमध्ये टॅग नंबरसह नोंदणी बंधनकारक असेल. (weighing) मशीन हारे दुग्ध
स्पर्धेतील सहभागी देवणी गायीच्या दुग्ध उत्पादनाची नोंद करण्यात येईल. विहित नमुण्यातील
दुग्धस्पर्धेसाठीचा अर्ज नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये उपलब्ध असेल व पशुपालकांनी
तो अर्ज भरून दुग्धंस्पर्धेच्या आयोजनाच्या वेळापत्रकानुसार संबधित पशुवैदयकिय दवाखान्याच्या
संस्थाप्रमंखाकडे सादर करावा. प्राथमिक स्तरावर
6 लिटर पेक्षा जास्त दुध देणा-या देवणी गाईची दुग्धनोंदणी पशुवैदयकीय संस्था स्तरावर
संबंधित संस्थाप्रमुख व पशुपालक यांच्या उपस्थितीत होईल. त्यानंतर आठ दिवसात तालुकास्तरावर 08 लीटर पेक्षा
अधिक दूध देणा-या देवणी गाईची निवड समितीमार्फत दुग्धस्पर्धाच्या निकषानुसार पशुपालकांच्या
दारातच दुग्धउत्पादनाच्या नोंदी घेण्यात येतील.
सदर निवड समिती पुढील प्रमाणे असेल. पशुधन
विकास अधिकारी(वि) संबधित तालुका -अध्यक्ष, संबधित संस्थाप्रमुख- सदस्य, संबंधित संस्थेचे
पालक पविअ - सदस्य, नजीकच्या संस्थेचे पविअ - सदस्य,बायफ संस्थेचे प्रतिनिधी-सदस्य,
देवणी ब्रीडर असोशियन प्रतिनिधी- सदस्य असतील.
व्दितीय नोंदीच्या आधारावर तालुक्यातून
प्रत्येक फेरीस प्रथम, व्दितीय व तृतीय पारीतोषिक देण्यात यतील. सदर योजनेतून तालुकास्तरावरील
प्रथम, व्दितीय व तृतीय स्पर्धकास अनुक्रमे रुपये 7 हजार, रुपये 5 हजार व रुपये 3 हजार
असे बक्षिस देण्यात येईल. देवणी गोवंश जातीच्या गाईचे दुग्ध् स्पर्धेसाठीचे वेळापत्रक
पूढील प्रमाणे आहे.
दुग्धस्पर्धा
पहिली फेरी- महिना जूलै, प्रसिध्दी प्रचार व अर्ज घेण्याचा कालावधी 15 जुलै 2022 ते
31 जूलै 2022, संस्थास्तरावर प्रथम दुग्ध्स्पर्धाची नोंद घेणे 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट,
तालुकास्तरावर व्दितीय दुग्ध्स्पर्धेची नोंद घेणे 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, दुग्धस्पर्धेचा
अहवाल सादर करणे 25 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट.
दुग्धस्पर्धा दुसरी फेरी- महिना ऑक्टोबर
संस्थास्तरावर प्रथम दुग्ध् स्पर्धाची नोंद घेणे 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर, तालुकास्तरावर
व्दितीय दुग्ध् स्पर्धाची नोंद घेणे 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दुग्ध्स्पर्धेचा अहवाल सादर करणे 25 ऑक्टोबर ते
30 ऑक्टोबर.
दुग्धस्पर्धा तिसरी फेरी- महिना जानेवारी-
संस्थास्तरावर प्रथम दुग्ध्स्पर्धाची नोंद घेणे 10 जानेवारी ते 15 जानेवारी, तालुकास्तरावर
व्दितीय दुग्ध् स्पर्धाची नोंद घेणे 20 जानेवारी ते 25 जानेवारी, दुग्धस्पर्धेचा अहवाल
सादर करणे 25 जानेवारी ते 30 जानेवारी असा आहे.
तालुका स्तरावर देवणी जातीच्या दुग्धस्पर्धेमध्ये
प्रथम व्दितीय व तृतीय निवड झालेल्या गाईच्या पशुपालकास बक्षिसाचे वितरण केले जाईल
असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000
Comments
Post a Comment