जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022-23
जिल्हास्तर सुब्रतो
मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2022-23
*लातूर,दि.18,(जिमाका):-* लातूर ग्रामीण- वयोगट 14 वर्षाआतील
मुले व वयोगट 17 वर्षाआतील मुली दिनांक 21
जुलै 2022 रोजी. वयोगट 17 वर्षाआतील मुले दि.22 जुलै 2022 रोजी. लातूर मनपा- वयोगट 14 वर्षाआतील मुले व 17
वर्षाआतील मुली दि.23 जुलै 2022 रोजी. वयोगट 17 वर्षाआतील मुले दि.24 जुलै 2022 रोजी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुल, बार्शी रोड,
लातूर येथे जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सन 2022-23 आयोजन
करण्यात आले आहे. संघ उपस्थिती स्पर्धेच्या दिवशी सकाळी ठीक 9.00 वाजता
असेल.
.सर्व संघानी आपल्या प्रवेशिका दिनांक 19 जुलै 2022 पर्यंत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर किंवा dsolatur@rediffmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात. स्पर्धा
प्रवेश फी भरून घ्यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले
आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी जन्मतारखेनुसार
वयोमर्यादा पूढील प्रमाणे आहे.
वयोगट 14 वर्षाखालील मुले (सब
ज्युनिअर) जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2009 किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. वयोगट 17
वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) जन्मतारीख दि. 1 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यानंतर
जन्मलेला असावा. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक जयराज मुंढे मो.नं. 8275273917
यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment