औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ
मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम
*लातूर,दि.21(जिमाका):-*मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांचे
निर्देशानुसार दिनांक 1 नोव्हेंबर,
2022 या अर्हता दिनांकावर आधारित
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करण्याचा कार्यक्रम
घोषित केलेला आहे. सदर कार्यक्रमानुसार दिनांक- 01 ऑक्टोबर, 2022 रोजी
जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असून नाव नोंदणीसाठीचा अर्ज नमूना -19 द्वारे दावे व हरकती दिनांक 07
नोव्हेंबर 2022 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, दिनांक- 23 नोव्हेंबर 2022 रोजी
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
करण्यात येणार असून तद्नंतर दिनांक 23 नोव्हेंबर 2022 ते दिनांक 09 डिसेंबर 2022
या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. सदर दावे व हरकती निकाली काढून
अंतिम मतदार यादी दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे.
त्यानुसार लातूर जिल्ह्यातील दिनांक 01
नोव्हेंबर,2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानुसार पात्र शिक्षक यांनी औरंगाबाद
विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने (de-novo) तयार करणे या
कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात वरीलप्रमाणे विहित कालावधीत नमुना-19
अर्ज भरून (आवश्यक कागदपत्रासह) आपले नाव शिक्षक मतदार संघाच्या मतदार
यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पृथ्वीराज
बी.पी., लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment