डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2022-23
डॉ.
झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण
योजना सन 2022-23
*लातूर,दि.5,(जिमाका)-* अल्पसंख्यांक
विकास विभागाच्या शासन निर्णय दि. 11 ऑक्टोबर 2013 अन्वये राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना राबविण्याबाबत
अल्पसंख्यांक विकास विभाग, परिपत्रक जा.क्र.अविवि-2022/प्र.क्र.39/का.6 दि. 15 जून
2022 अन्वये कळविण्यात आले आहे.
त्याअनुषंगाने मदरसा चालकांनी या योजनेअंतर्गतचे
प्रस्ताव दिनांक 11 ऑक्टोबर 2013 च्या शासन निर्णयाप्रमाणे विहित नमुन्यात रितसर परिपूर्ण
प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, बार्शी रोड, लातूर या
कार्यालयात दि. 30 ऑगस्ट 2022 दुपारी 5 वाजेपर्यंत सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त
प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. असे जिल्हा नियोजन अधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment