मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाचा सावधगिरीचा इशारा
*मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठच्या गावांना
*जिल्हा प्रशासनाचा सावधगिरीचा इशारा*
*लातूर, (जिमाका) दि.12:-* मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बॅरेज, को.प.
बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment area) येवा सुरु असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार पर्जन्यवृष्टी
राहून येवा (Inflo) असाच राहिला तर प्रकल्प
केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे कार्यकारी अभियंता,
लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूर यांनी कळविले आहे.
मांजरा, तेरणा आणि तावरजा नदीकाठच्या गावाना / शेतकऱ्यांना
नदीकाठी वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. आपले नैसर्गिक
आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासांनी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही
हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास द्यावा. व सदर कालावधीत जिल्ह्यातील सर्व
शेतकरी / नागरिक यांनी पुढील प्रमाणे खबरदारी घ्यावी. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली
/ पाण्याच्या स्त्रोताजवळ / विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत.
आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.
जलसाठयाजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठयावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू
नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे,
पुलावरुन / नाल्यावरुन पाणी वाहत असताना कोणीही
स्वत:किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करु नये, पूर प्रवण क्षेत्रात कोणीही
जाऊ नये. पाउस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते.
तरी त्यापसून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा
सुचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच /
कृषी सहाय्यक यांचेव्दारे निर्गमित करुन आपण आपल्या कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या गावांना
सावधगीरीची सूचना देवून योग्य त्या उपाययोजना करुन तसा अनूपालन अहवाल या कार्यालयास
सादर करावा.सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये असे अपर जिल्हादंडाधिकारी
लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment