जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर कराव्यात
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत
जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर कराव्यात
लातूर दि. 28:- (जिमाका)
राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत 284 पंचायत समितीत्यांचा
आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.
जिल्हा परिषद निवडणूक
विभागासाठी व पंचायत समिती निर्वाचक गणासाठी टप्पा सुरु करण्याचा, संपविण्याचा दिनांक
28 जुलै, 2022 रोजी. सोडतीनंतर निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षणाची प्रारुप
अधिसूचना प्रसिध्द करण्याचा टप्पा सुरु करण्याचा, संपविण्याचा दिनांक 29 जुलै,
2022. निवडणूक विभाग, निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चितीबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे
हरकती व सूचना सादर करण्याचा दिनांक 29 जुलै, 2022 ते दिनांक 2 ऑगस्ट, 2022 मागविण्याचा
दिनांक असणार आहे. आरक्षण निश्चितीबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करुन
निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे अंतिम आरक्षण विहीत नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द
टप्पा सुरु करण्याचा / संपविण्याचा दिनांक 5 ऑगस्ट, 2022 रोजी असणार आहे.
**
Comments
Post a Comment