खरीप हंगामातही शेतकऱ्यांसाठी पिकस्पर्धा
खरीप
हंगामातही शेतकऱ्यांसाठी पिकस्पर्धा
*लातूर
दि.14(जिमाका):-* रब्बी हंगामात घेण्यात इआलेल्या पीक स्पर्धेला शेतकऱ्यांचा
मोठा प्रतिसादर मिळाला होता. आता खरीप हंगामातही शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात
येणार आहे. मूग,उडीद पिकांसाठी 31 जूलैपूर्वी तर इतर पिकांसाठी 31 ऑगस्टपूर्वी इच्छूक
शेतकऱ्यांना अर्ज करता येणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने
यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी
विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात आणि उत्पादकतेत वाढ करण्यात
येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या
शेतकऱ्यांचा गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत
तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी
शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन
एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा
योजना राबविण्यात येते.
खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी,
बाजरी , मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबनी, भुईमूग, सूर्यफूल अशा अकरा पिकांचा
समावेश करण्यात आला आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment