जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध तिरंगा ध्वज विक्री केंद्राचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते उद्घाटन

 

जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध

तिरंगा ध्वज विक्री केंद्राचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते उद्घाटन

 

लातूर,दि.29(जिमाका):-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित दिनांक 8  ऑगस्ट ते 17 ऑगस्ट, 2022 दरम्यान स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सदर अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 13 ते 15 ऑगस्ट, 2022 रोजी हर घर झेंडा हा उपक्रम हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व घरे, दुकाने सरकारी व सहकारी आस्थापना यावर तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुमारे 3.75 लक्ष ध्वजांची आवश्यकता भासणार आहे. सदर ध्वज हे ग्रामपंचायती, बचत गट यांनी खरेदी करावी. तसेच प्रती ध्वज रुपये 30/- या दरात विक्री करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध आहे. या विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार अभिमन्य पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आदि विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

 

                                         ****






 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु