जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणूक-2022_13 जूलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीस तुर्तास स्थगिती
*जिल्ह्यातील
जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणूक-2022*
13 जूलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीस तुर्तास स्थगिती
*लातूर,
(जिमाका) दि.12:- मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेशान्वये दिनांक
12 जूलै 2022 अन्वये जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक
निवडणुका-2022 साठीचे दिनांक 13 जूलै 2022 रोजी होणाऱ्या आरक्षण सोडत कार्यक्रमास तुर्त
स्थगिती दिलेली आहे.
तसेच यासंदर्भात सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश कळविण्यात येणार असल्याचे
मा. आयोगाने कळविले आहे. तरी याबाबत सर्व संबंधितांनी अवलोकन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी
पृथ्वीराज बी.पी. यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment