जिल्ह्यातील दिव्यांगानी राष्ट्रीय पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

जिल्ह्यातील दिव्यांगानी राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

          *लातूर,दि.26 (जिमाका):-*  केंद्र शासनाच्या योजनेच्या अनुषंघाने दिव्यांग व्यक्तींना सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येता आहेत.या साठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांर्तगत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या संकेत स्थळावर दिव्यांग व्यक्तीकरिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन व अर्ज मागविण्याकरिता दिनांक 15 जूलै 2022 ते 28 ऑगस्ट 2022 या करिता संकेतस्थळ उघडण्यात आले आहे.याची सविस्तर कार्यप्रणाली खलील प्रमाणे

               अर्ज / नामांकन www.awards.gov.in या संकेतस्थळावरून भरण्यात यावे व दिनांक २८/०८/२२ पूर्वी राष्ट्रीय पुरस्कार २०२१ व २०२२ करिता प्राप्त सर्व अर्ज / नामांकने विचारात घेण्यात येतील.सन २०२१ आणि २०२२ करिता स्वतंत्ररित्या अर्ज  / नामांकने केवळ ग्रहमंत्रालयाने तयार केलेल्या (URL. www.awards.gov.in) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावेत.या पोर्टलवर उपलब्ध्‍ असणाऱ्या विशिष्ठ नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी.समक्ष अथवा पोष्टाव्दारे सादर केले जाणारे अर्ज स्विकारले जाणार  नाहीत.

             जिल्हयातील जास्तीत जास्त दिव्यांगानी  राष्ट्रीय पुरस्कार २०२१-२२ करिता खालील संकेतस्थळावर अर्ज  करावेत.व तीन प्रतीमध्ये हार्डकॉपी जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद, लातूर  या कार्यालयात  विहीत मुदतीत सादर करण्याबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद लातूर यांनी आवाहन केले आहे.

पात्रता व निकष इतर तपशील पाहण्यासाठी  www.disibilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध्‍ आहे असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परीषद लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

                                                                  0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु