एक लाख वृक्ष लागवड करण्याचा समाज कल्याण विभागाचा निर्धार

 

*एक लाख वृक्ष लागवड करण्याचा*

*समाज कल्याण विभागाचा निर्धार*

 


*लातूर,(जिमाका),दि.12:-*
यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद, येथे  दिव्यांग शाळा जाती आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अनुदानित वसतिगृह व अनु,कार्यशाळा / वसतिगृह अधिक्षक यांची वृक्ष लागवड करणेबाबत संयुक्तरित्या कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेस औसा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी, सुदाम मुंडे यांनी वृक्ष लागवडी संदर्भात मार्गदर्शन करुन  मियावॉकी / घनदाट जंगल ही संकल्पना विशद केली. घनदाट जंगल हे 10X10 च्या कमीत कमी क्षेत्रात होवू शकते, याबाबत सविस्तर माहिती प्रोजेक्टवर प्रत्यक्ष दाखविण्यात आली. या कार्यशाळेच्या औचित्यानी  शासनाच्या 1 लाख वृक्ष लागवडीचा उद्देश पुर्ण करण्याचा निर्धार समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आला. समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शाळा व वसतिगृहाच्या परिसरात उपलब्ध जागेमध्ये पाच मियावॉकी / घनदाट जंगल उभारणचा मानस आजच्या कार्यशोत करण्यात आला. ज्या शाळा किंवा वसतिगृहास वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध नाही, त्या शाळेस किंवा वसतिगृहास वृक्ष लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुचीत केले. सदर कार्यशाळेस अतिरिक्त  मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर,कृषि विकास अधिकारी सुभाष चोले,तसेच दिव्यांग शाळा व अनु जाती आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अनुदानित वसतिगृहातील अधिक्षक असे एकूण 131 कर्मचारी  तसेच समाज कल्याण विभागातील दत्तात्रय कुंभार, बालासाहेब वाकडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन दिव्याग विभागाचे राजू गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन अंकुश बिरादार यांनी मानले.

                                                 0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु