रा.प. विभागीय कार्यशाळेसाठी सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायनिहाय शिकाऊ उमेदवार भरती
रा.प. विभागीय कार्यशाळेसाठी सन 2022-23 सत्रासाठी
वेगवेगळया व्यवसायनिहाय शिकाऊ उमेदवार भरती
*लातूर,दि.18,(जिमाका):-* महाराष्ट्र
राज्य परिवहन महामंडळ, लातूर विभाग, लातूर मध्ये सन 2022-23 सत्रासाठी वेगवेगळया व्यवसायाकरीता
शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी) म्हणून 52 पदे ऑनलाईन पध्दतीने पद / जागा निश्चित करण्यात
आले असून त्यानुसार एकूण 52 जागा (यांत्रिक मोटारगाडी (एमएमव्ही)- 36, विजतंत्री (ईलेक्ट्रीशियन)-05,
सांधाता (वेल्डर) (गॅस ॲन्ड ईलेक्ट्रीकल)-01, मोटारगाडी साठाजोडारी (एमव्हीबीबी) (शिट
मेटल वर्क्स), -07, पेंन्टर-01, अभियांत्रिकी पदवीधर / पदविका-02 अशी (एकुण-52) जागा
/ पदे भरावयाची आहेत. त्यासाठी www.apprenticeship.gov.in ऑनलाईन अर्ज दि. 11 ते दि.
31 जूलै 2022 वेळ 11.00 वाजेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन राज्य परिवहन महामंडळाचे विभाग
नियंत्रक यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
वर दर्शविण्यात आलेल्या व्यावसायातील आय
टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी सर्व प्रथम
MIS वेब पोर्टलवरील www.apprenticeship.gov.in या वेबसाईटवर
दि. 11 ते दि. 31 जूलै 2022 वेळ 11-00 वाजेपर्यंत
ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करुन MSRTC Division Latur या आस्थापने (E01172700461) करिता ऑनलाईन
अप्लाय करणे आवश्यक आहे.त्यामुळे सदरचे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या शिकाऊ उमेदवारीकरीता
इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज भरण्याची तारीख दि. 1 ते दि. 4 ऑगस्ट 2022 वेळ 15-00 वाजेपर्यंत करण्यात आली आहे.
सदरचे
छापील अर्ज राज्य परिवहन विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका,अंबाजोगाई रोड,
लातूर (आस्थापना शाखा) येथे दि. 1 ते दि. 4 ऑगस्ट 2022 वेळ 15-00 वाजेपर्यंत शनिवार व सुटीचे दिवस वगळून
मिळतील व लगेच स्विकारले जातील. सदरहु अर्जाची किंमत (GST 18 टक्के सहित) खुल्या प्रवर्गातील
रुपये 590/- व मागासवर्गीयांसाठी रुपये 295/- आहे. त्याप्रमाणे खुल्या प्रवर्गातील
उमेदवारांनी MSRTC Found Account
Latur या नावाने रु. 590/- चा व मागासवर्गीय उमेदवरांसाठी रु. 295/- चा धनाकर्ष
किंवा आय.पी.ओ. (इंडियन पोस्टल ऑर्डर) अर्ज घेतेवेळी सोबत आणणे आवश्यक आहे.
दि.
11 जूलै 2022 पुर्वी व दि. 31 जूलै 2022 रोजी वेळ 11 नंतर ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केलेल्या
उमेदवारांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ते रद्द समजले जातील व त्यांना या
कार्यालयाचा छापील नमुन्यातील अर्ज देण्यात येणार नाही. जे उमेदवार दि. 4 ऑगस्ट
2022 रोजी वेळ 15.00 वाजेपर्यंत या कार्यालयाचे विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणार नाहीत
त्यांचा शिकाऊ उमेदवार भरतीसाठी विचार केला जाणार नाही असे विभागीय नियंत्रक रा.प.
लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0000
Comments
Post a Comment