जि.प.,पं.स. सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द* *मतदार यादी संदर्भात हरकती, सुचना असल्यास* *जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालयात वेळेत सादर करावेत*

 

*जि.प.,पं.स. सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द*

*मतदार यादी संदर्भात हरकती, सुचना असल्यास*

*जिल्हाधिकारी कार्यालय, संबंधित तहसील कार्यालयात वेळेत सादर करावेत*

  *लातूर,दि.18,(जिमाका):-* मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांचे आदेश क्र.रानिआ/जिपपंस-2022/प्र.क्र.11/का.7 दिनांक 6 जूलै 2022 अन्वये लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम दिलेला आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकासाठी प्रारुप मतदार यादी दिनांक 18 जूलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्व तहसिल कार्यालय इत्यादी ठिकाणी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.

याव्दारे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रारुप मतदार यादीचे आवलोकन करावे. व मतदार यादीसंदर्भात हरकती / सुचना असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय / संबंधित तहसील कार्यालयामध्ये दिनांक 22 जूलै 2022 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                              000

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु