उमेदवारांनी सेवायोजन कार्ड (एम्प्लॉयमेंट कार्ड) नाव नोंदणीला आधार लिंक करुन घेण्याचे आवाहन

 

उमेदवारांनी सेवायोजन कार्ड  (एम्प्लॉयमेंट कार्ड) नाव नोंदणीला

आधार लिंक करुन घेण्याचे आवाहन

 

       *लातूर दि.14(जिमाका):-* राज्य शासनाच्या पूर्वीच्या रोजगार व स्वयंरोजगार व सध्याच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राकडे नोकरी इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांना नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी ला आधार कार्ड लिंक केले नाही अशा उमेदवारांना नोकरीच्या संधी व या विभागाच्या इतर योजनेचा लाभ होऊ  शकत नाहीत कारण त्यांचे नाव नोंदणीला आधार कार्ड लिंक नसते.

          ज्या उमेदवारांनी नाव नोंदणी ला आधार कार्ड लिंक केले नाही अशा उमेदवारांनी यापूर्वी सेवायोजन कार्यालय, (एम्प्लॉयमेंट ऑफिस) मध्ये नाव नोंदणी केली आहे परंतू त्याला आधार कार्ड लिंक करण्यात आलेले नाही अशा उमेदवारांनी लवकरात लवकर नांव नोंदणी (एम्प्लॉयमेंट कार्ड) ला आधार लिंक करावे. जेणे करून आपणास खाजगी क्षेत्रात नोकरीच्या जास्तीत जास्त्‍ संधी उपलब्ध होतील. हि सुविधा ऑनलाईन असल्याने आपण पूढील पध्दतीने नांव नोंदणीला (एम्प्लॉयमेंट कार्ड) ला आधार लिंक करावे.

आधार कार्ड लिंक करणे बाबत पूढील प्रमाणे स्टेप कराव्यात. www.mahaswayam.gov.in यासंकेतस्थळाचे होमपेज उघडावे.  होमपेजवरील Employment टॅबवर Click करावे. डाव्या बाजूच्या खाली Jobseeker (Find a Job) मधून पढे Login Box मध्ये पुर्वीचे सेवायोजन (एम्पॉलयमेंट) कार्ड वरील Registration Number / User ID व   Password ने Login करावे. (Password विसरला असल्यास Registration Number  टाकून Forgot Password वर क्लिक केल्यानंतर  आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर नवीन पासवर्ड चा SMS येईल त्याने Login करावे.

आपली वैयक्तीक माहिती (Name, Middle Name, Last Name & Date of Birth) आधारप्रमाणे भरून मोबाईल क्रमांक अचूक नोंदवावा व Captcha अचूक नोंदवून 

Next (Submit) Option वर क्लिक करावे. आपल्या मोबाईल क्रमांकावर OTP असलेला SMS प्राप्त होईल प्राप्त झालेला OTP भरल्यानंतर येणाऱ्या (Reset Password) डायलॉग बॉक्स मध्ये पासवर्ड अद्यावत करावा. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर User ID (नोंदणी क्रमांक) व Password प्राप्त होईल. या पासवर्ड व नोंदणी क्रमांकाचा वापर करून Login करावे.

           Edit (संपादित करा) या Option वर क्लिक करून आपली शैक्षणिक व इतर माहिती अद्यावत करावी. एम्पॉलयमेंट कार्ड (नाव नोदणी प्रमाणपत्र) प्राप्त करण्यासाठी उजव्या बाजूच्या My Profile बटना वर क्लिक करावे व Generate Receipt या बटनावर क्लिक करून  एम्प्लॉयमेंट कार्ड (नाव नोदणी प्रमाणपत्र) ची प्रत प्राप्त करावी.

          नांव नोंदणी (एम्प्लॉयमेंट कार्ड) ला आधार लिंक करताना काही अडचण आल्यास या कार्यालयाच्या 02382-299462 या दुरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 10.00 ते  सायं. 06.00 पर्यत किंवा ई-मेल आडी laturrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असे अवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र , लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.  

 

                                                                    000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा