उद्या दि.24 जुलै रोजी होणाऱ्या ऐतिहासिक वृक्षलागवडीसाठी ; चौदा गावात पावसातही जोरदार तयारी


उद्या दि.24 जुलै रोजी होणाऱ्या ऐतिहासिक वृक्षलागवडीसाठी ; चौदा गावात पावसातही जोरदार तयारी

        लातूर दि.23(जिमाका) मांजरा नदीच्या दुतर्फा 14 गावात दहा किलोमीटर मानवी साखळी करून जे 28 हजार वृक्ष लावले जाणार आहेत. त्या गावात वृक्ष लागवडीसाठी मोठ्या उत्साहात पावसातही खड्डे करण्याचे काम सुरु आहे. उद्या होणाऱ्या वृक्ष लागवडीला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनी या चौदा गावापैकी कुठेही उपस्थित राहून जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या कार्याला हातभार लावावा.. असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

    लातूर तालुक्यातील भातखेडा, सोनवती, धनेगाव, शिवणी खुर्द, भातांगळी, भाडगाव, रमजानपूर, उमरगा, बोकनगाव, सलगरा ( बु. ), बिंदगीहाळ तर औसा तालुक्यातील शिवणी बु, तोंडवळी, होळी या गावातील मांजरा काठावरील जमिनीवर प्रत्येक 10 फुटाच्या अंतरावर झाड लागणार आहे. 28 हजार खड्डे आणि त्यात 28 हजार वृक्ष 11 वाजून 11 मिनिटांनी लावली जाणार आहेत.

            ह्या कार्यक्रमाचे औपचारिक उदघाटन भातखेडा येथील पुलाच्या जवळ होणार आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी , विविध सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी  या कार्यक्रमाला येणार आहेत.. आपणही सहकुटुंब या मानवी जीवनाला आधार देणाऱ्या वृक्ष लागवडीला यावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

                                                       000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु