लातूरचा आणखी एक नवा पॅटर्न, कचरा वेचक स्त्रियां होणार 100 ई - व्हेईकलच्या मालक

 

दृष्टी बदला, दृष्टीकोन बदलेल,  कचरा कामगारासाठी ही सोन्याची सकाळ

                 - जम्मू आय.आय.एम. चे अध्यक्ष, डिक्कीचे चेअरमन पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे

 

§  आज प्रतिनिधिक स्वरूपात ई-व्हेईकलचे वाटप


लातूर,दि.21(जिमाका):- लातूरचा शहरात आणखी एक नवा पॅटर्न सुरु होत असून कचरा वेचणाऱ्या स्त्रिया आता पर्यावरण पूरक 100 ई - व्हेईकलच्या मालक आणि चालक होणार आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिनिधिक स्वरूपात ई - व्हेईकलचे वाटप आय.आय. एम जम्मू  आणि डिक्कीचे अध्यक्ष  पद्मश्री मिलिंद कांबळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल यांच्या हस्ते करण्यात आले.


आजचा काळ जलद आहे, तुम्ही जेवढी जलद आणि गुणवत्तापूर्ण सेवा द्याल तर तुमच्या कार्याला मोल आहे. त्यामुळे दृष्टी बदलली, की दृष्टीकोन बदलेलं हे लक्षात ठेवून काम करा. तुम्ही आता पर्यावरण पूरक वाहनातून कचरा वेचणार आहात, त्याला आता हवा प्रदूषित करणारं डिझेल लागणार नसून एकदा बॅटरी चार्ज केली की 100 किलो मीटर चालणार आहे. त्यामुळे तुम्ही पर्यावरणाच्या रक्षक होणार आहात.. आजची सोनेरी सकाळ तुमचं भविष्य उज्वल करेल, अशी आशा पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी यावेळी बोलून दाखविली.


 वातावरणात होणारे बदल , वाढते तापमान यावर आपल्याला नियंत्रण करायाचं असून त्यासाठी पर्यावरण रक्षण आता आपली प्रमुख जबाबदारी असणार आहे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन याला अत्यंत महत्व येणार असून आता "माझा कचरा, माझी जबाबदारी" अस स्लोगन प्रत्येकानी अंगीकारावे लागणार असल्याचेही कांबळे यांनी यावेळी सांगितले.


सफाई कर्मचारी उद्यमी अभियानांतर्गत एस. बी. आय. द्वारे महिला सफाई कामगार यांना ई- व्हेईकल वितरण व जिल्हा उद्योग केंद्र लातूर द्वारा मुख्यमंत्री रोजगार योजनेतील कार्यक्रम - 2022- 2023 कार्यक्रम सोहळा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात संपन्न झाला.

         


या कार्यक्रमास जम्मू आयआयएमचे अध्यक्ष, डिक्कीचे संस्थापक पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., प्रमुख उपस्थिती म्हणून मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिथी म्हणून मॅटोर डिक्की नेशनल वूमन विंग सीमा कांबळे, नांदेड उपविभागाचे अधीक्षकीय उद्योग अधिकारी  नितीन कोळेकर, उप-महाव्यवस्थापक अकुला श्रीनिवास,  जन-आधार संस्थाचे संजय कांबळे, मैत्रेय कांबळे, डीलर नंदकुमार बीजलगावकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हनबर , उमेदचे देवकुमार कांबळे, एलडीएम कसबे, उद्योजक आदीची उपस्थिती होती.


सफाई कर्मचारी उद्यमी अभियानांतर्गत एस. बी. आयद्वारे महिला सफाई कामगार यांना ई- व्हेईकल वितरण व जिल्हा उद्योग केंद्र लातूर द्वारा मुख्यमंत्री रोजगार योजनेतील कार्यक्रम - 2022- 2023 कार्यक्रमातर्गत 30 महिला बचत गटांना प्रतिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. तर 100 महिलांना हे कर्ज वितरण करण्यात येणार आहे. या प्रत्येक वाहनांची किंमत 3 लाख 67 हजार इतकी आहे. ती कायनेटिक या कंपनीच्या आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने वैभवशाली लातूर ही पुस्तिका देऊन मिलिंद कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

           या वाहनांमुळे डिझेलवर होणारा खर्च, पर्यावरण पूरक असून यातून त्यांच्या वेतनावर चांगला व त्यांची आर्थिक परिस्थितीही बदल होणार आहे.

             मनपा आयुक्त अमन मित्तल म्हणाले की, कचऱ्यामध्ये सोन आहे , अस म्हणणं वावग ठरणार नाही. मोफत चार्जिंग स्टेशन मनपातर्फे उपलब्ध करून आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (सीएमईजीपी)  या योजनेचा प्रसार व जनजागृती करावी, आणि महिलांनी उद्योजिका म्हणून उदयास यावं.  महिलांना एक करोड रुपयांचा कर्ज वितरणाचे अर्थसहाय्य प्रमाणपत्र देण्यात आला. उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटाना दीड कोटी रुपये  वितरण करण्यात आले.  

             श्रीमती सीमाताई कांबळे म्हणाल्या की, आयआयएमच्या माध्यमातून देशातील तरूणांना उद्योग करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. महिला आपली कर्तव्ये जबाबदारीने अखंड प्रयत्न असतात. महिलांना चांगल्या गोष्टींचा प्रामाणिक जबाबदारीने त्या पार पाडत असल्याने तिच्यात गुण आहेत. महिला कोणत्याही व्यवसाय करू शकतात. ज्या महिलांनी ई-व्हेईकल घेतली आहेत, त्यातून त्यांचा विकास होणार आहे. महिलांच सक्षमीकरणं होणार आहे. उद्योजक होत असताना, खूप अडचणी असतात. लातूरमधून सुरुवात होत असल्याने समाधान होत असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे की, आपल्या महिला या खांद्याला खांदा देऊन काम करतील त्यांना सोबत घेऊन पुढे जा.

           जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव म्हणाले की, सीबीआय, डीआयसी आणि डिक्की यांच्या सहकार्याने पर्यावरण पूरक वाहने उपलब्ध झाली असून यातून आर्थिक बचतही होणार आहे. महिलांना कर्ज वितरणासोबत उद्योजक बनण्यासाठी जिल्हा परिषद मदत करत असते. बचत कर्ज देताना त्यांना कर्ज फेडण्यासाठीही त्यांना सजग करण्यात येते. यापुढेही महिलाच सशक्तीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 

             स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक श्रीमती मेरी सगाया धनपाल म्हणाल्या की, महिला या कुटुंबाचा कणा आहेत, आणि कुटुंबं देशाचा कणा आहेत. त्यामुळे महिला या खऱ्या अर्थाने कुटुंबाचे व्यवस्थापन करतात, त्या अधिक सजग झाल्या तर समाजाच चित्र बदलेलं. 

            जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की, लातूर जिल्हा हा कोणत्याही क्षेत्रात पॅटर्न तयार करतो.              ई - व्हेईकलही राज्यातला पहिला पायलट प्रोजेक्ट आहे, याची व्याप्ती वाढवून नगर परिषद क्षेत्रापर्यंत नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यां वाहनांमुळे डिझेलची गरज लागणार नाही. त्यामुळे अर्थिक बचत होणार आहे. यातून मनपाला देखील फायदा होणार आहे. हे कर्ज पाच वर्षात परतफेड होणार आहे.

 या बचतीमुळे आता महिलांचे वेतन पण वाढवावे अशी सूचना संस्थेला जिल्हाधिकारी यांनी केली. आणि महिलांनी या वाढीव पैशाची गुंतवणूक त्यांच्या मुलांच्या शिक्षणात लावावी व पुढची पिढी उत्तम घडवावी असे आवाहनही त्यांनी केले.

              मनपा आयुक्त अमन मित्तल म्हणाले की, या ई कचरा गाड्याला मोफत चार्जिंग स्टेशन मनपातर्फे उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहिलं. 

यावेळी उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांना दीड कोटी रुपये  वितरण करण्यात आले. यावेळी डिक्कीच्या महिला विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे यांनी महिलांनी व्यवसाय, उद्योग याकडे वळावे, त्यासाठी डिक्की तुम्हाला सहकार्य करेल असे सांगितले. श्रीमती अर्चना गायकवाड सफाई कामगार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आणि सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले.  

****

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा