कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर
कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन
स्पायरल सेपरेटर व सोयाबीन टोकण
यंत्र
50 टक्के अनुदानावर
लातूर,दि.11
(जिमाका):- जिल्ह्यातील सर्व शेतकरी यांना कळविण्यात येते
की,
जिल्हा परिषद लातूर सेस फंडातून कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन
स्पायलर सेपरेटर व सोयाबीन टोकण यंत्र 50 टक्के अनुदानावर
DBT तत्वावर देण्यात येणार आहेत. यापुर्वी औजारेसाठी
पंचायत समितीस्तरावर अर्ज करण्यासाठी
शेतक-यांना अवाहन करण्यात आले होते.
परंतु भौतिक साध्याप्रमाणे अपेक्षित अर्ज
पंचायत समिती स्तरावर प्राप्त न आल्याने
लातूर जिल्हयातील शेतक-याना कडबाकुट्टी सयंत्र, सोयाबीन स्पायरल सेपरेटर व
सोयाबीन टोकण यंत्र यासाठी पंचायत समितीस्तरावर अर्ज करण्याचे फेर अवाहन
करण्यात येत आहे. सदर योजनेमध्ये अनु. जाती, अनु. जमाती
व महिला यांना प्राधान्य राहील. तरी इच्छुक शेतक-यांनी स्वतःचा सातबारा,
आठ-अ, आधार कार्ड, बॅंक +पासबुकाच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनु. जाती, अनु. जमातीचे असल्यास
जातीचे प्रमाण पत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत
समिती कडे अर्ज करावेत.
लाभार्थ्याची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक
महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडुन आपल्या पंसतीच्या
औजाराची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी
परिक्षण करुन ते B.I.S. अथवा अन्य संस्थानी
निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार / तांत्रीक निकषानुसर असावे लागेल. सदर औजारासाठी जास्तीचे अर्ज
प्राप्त झाल्यास लक्षांकानुसार सोडत पध्दतीने लाभार्थ्याची निवड संबंधीत
पंचायत समिती स्तरावर करण्यात येईल. मंजुर औजाराचे अनुदान संबंधीत शेतक-याच्या
आधार लींक असलेल्या बॅंक खात्यावर DBT प्रणालीव्दारे
अदा करण्यात येईल.
तरी
इच्छुक शेतक-यानी 20 जुलै 2022 पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे
परिपुर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत असे फेर अवाहन कृषि विकास अधिकारी व मा. अति.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment