खरीप हंगाम 2022 पिक विमा भरण्यास सुरुवात अंतिम मुदतीची वाट न पाहता, शेतकऱ्यांनी वेळेत पिक विमा सहभाग नोंदवीण्याचे कृषि विभागाचे आवाहन

 

खरीप हंगाम 2022 पिक विमा भरण्यास सुरुवात

अंतिम मुदतीची वाट न पाहता, शेतकऱ्यांनी वेळेत 

पिक विमा सहभाग नोंदवीण्याचे कृषि विभागाचे आवाहन

 

            *लातूर,(जिमाका),दि.20:-*खरीप हंगामातील पिकासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत विमा प्रस्ताव सादर करण्याची दि. 31 जूलै 2022 ही अंतिम मुदत आहे. शेवटच्या टप्यात तांत्रीक अडचणी निर्माण होतात म्हणून शेतकऱ्यांनी गर्दी न करता वेळेत विमा सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

तसेच विमा सहभाग नोंदवताना आपला मोबाईल क्र. इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करावा जेणेकरुन विमा सहभागाबाबतची माहीती एस.एम.एस द्वारे शेतकऱ्यांना दिली जाईल. सी.एस.सी. केंद्र/बँक यांनी शेतकऱ्यांकडून तलाठ्यामार्फत साक्षांकीत केलेला सातबारा देण्याचा आग्रह करु नये सी.एस.सी. केंद्र चालकांनी विना शूल्क विमा भरुन घ्यावा.

कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होणे अथवा न होणे बाबत कर्ज खाते असलेल्या बँक शाखेत विहीत नमून्यात स्वतंत्र घोषणापत्र सादर करणे बंधनकारक आहे. जे कर्जदार शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

            इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात,भारतीय कृषि विमा कंपनी मार्फत कार्यरत पिक विमा सुविधा व सल्ला केंद्रामध्ये, नजीकच्या बँकेत किंवा www.pmfby.gov.inया संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध् करुन घेता येईल.जिल्ह्यातील अधिसूचित पिके,विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे.

            पिके, विमा संरक्षित रुपये / हेक्टर शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये / हेक्टर व अधिसूचित तालुके / महसूल मंडळ पूढील प्रमाणे आहे. पिके- सोयाबीन, विमा संरक्षित रुपये हेक्टर 54000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये /हेक्टर 1080 व अधिसूचिततालुके / महसूलमंडळ सर्व तालुक्यातील सर्व मह.मंडळ, तूर- विमा संरक्षित रक्क्म रुपये/ हेक्टर 36802, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 736.04 व अधिसूचिततालुके / महसूलमंडळ सर्व तालुक्यातील सर्व मह.मंडळ.

       मूग- विमा संरक्षित रक्क्म रुपये/ हेक्टर 22000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 440 व अधिसूचित तालुके / महसूलमंडळ सर्व तालुक्यातील सर्व मह.मंडळ, उडीद- विमा संरक्षित रक्क्म रुपये/ हेक्टर 22000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 440 व अधिसूचित तालुके / महसूलमंडळ सर्व तालुक्यातील सर्व मह.मंडळ, ख.ज्वारी- विमा संरक्षित रक्क्म रुपये/ हेक्टर 27000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 540 व अधिसूचित तालुके / महसूलमंडळ सर्व तालुक्यातील सर्व मह.मंडळ.

          कापूस- विमा संरक्षित रक्क्म रुपेय/ हेक्टर 52000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 2600 व अहमदपूर तालुक्यातील सर्व मह.मंडळ, जळकोट, लातूर, रेणापूर, उदगीर, देवणी व चाकूर तालुके, बाजरी- विमा संरक्षित रक्क्म रुपये/ हेक्टर 24000, शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता रुपये/ हेक्टर 480 व अधिसूचित तालुके / महसूलमंडळ सर्व तालुके.

            तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई-पिक पाहणी या मोबाईल ॲप वर अचूक माहिती नोंदवावी. विमा संरक्षित पिक व ई-पिक पाहणी मध्ये नोंदवलेले पिक यात तफावतीत मुद्दा उदभवल्यास ई-पिक पाहणी मध्ये नोंदवलेले पिक अंतिम ग्रहीत धरण्यात येईल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. कर्जदार शेतक-यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पिक बदलाबाबत सुचना देण्याचा अंतिम दिनांक विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापुर्वी 2 कार्यालयीन दिवस अगोदर असेल. तरी शेवटच्या टप्यात गर्दी व घाई न करता वेळेत आपल्या अधिसूचित पिकाचे विमा संरक्षणासाठी नजीकच्या बॅकेत/नागरी सुविधा केंद्र मार्फत पिक विमा संरक्षण घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर यांनी केले आहे.

                                               0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु