केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन 

               *लातूर,दि.27(जिमाका):-*  असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षिततेच्या योजनांचे कवच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाने ई-श्रम संकेत स्थळाचे अनावरण केले आहे. श्रमिकामधील अत्यंत वंचित घटकाला ई-श्रम संकेत स्थळाच्या माध्यमातून ओळख आणि संघटित रूप मिळवता येणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील विविध क्षेत्रातील 38.00 कोटी असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. 

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या https://register.eshram.gov.in/#/user/self या पोर्टलवर राज्य सरकार, कामगार संघटना आणि सामाईक सेवा केंद्र (CSC-Setu) यांच्या मदतीने मत्स्यकामगारांची नोंदणी केली जाणार आहे. मत्स्यव्यवसायाशी संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याचा तपशील इत्यादी माहितीसह नोंदणी करता येईल.

पात्रता :

         भारताचा नागरिक असावा. मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती  क्षेत्रातील मच्छीमार व मत्स्यमुल्य साखळी(Fisheries Value Chain) इत्यादी मध्ये समाविष्ट असलेले मत्स्य कामगार. वयोमर्यादा – 16 ते 59 वर्ष. Employee’s State Insurance (ESI), Employee’s Provident Fund Organization(EPFO) चे सभासद नसावेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU’s) व शासन सेवेतील कर्मचारी नसावेत. आयकर भरणारे (Income Tax Payee) नसावेत.

संकेत स्थळावर नोंदणी करणे : संकेत स्थळावर नोंदणी करण्यासाठी 14434 हा राष्ट्रीय नि:शुल्क संपर्क क्रमांक तयार करण्यात आला असून याद्वारे कामगारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आधार क्रमांक, जन्म दिनांक, बँक खाते तपशील, मुळ गाव, संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी माहिती आवश्यक आहे.

मत्स्यकामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास खालीलप्रमाणे लाभ होतील : केंद्र शासनाने असे पोर्टल तयार केले आहे कि, ज्यामध्ये असंघटीत मजूर, मच्छीमार, मत्स्यशेती व मत्स्यअनुषंगीक कामामध्ये समावेश असलेले मजूर इत्यादींची एकत्रित माहिती आधार नंबरशी जोडून अपलोड करण्यात येते. जे कामगार या पोर्टलवर नोंदणी करतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत व्यक्ती मृत झाल्यास रु. 2.00 लक्ष व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रु. 1.00 लक्ष देण्यात येणे शक्य होईल. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टलमार्फत देण्यात येणे शक्य होईल. पोर्टलवरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या व राष्ट्रीय महामारी सारख्या परिस्थितीमध्ये, सहाय्यासाठी वापरता येणे शक्य होईल. असंघटीत क्षत्रातील कामगारांची माहिती घेऊन त्यानुसार सरकार विविध योजना आणि नियम  तयार करू शकेल. सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा लाभ असंघटीत क्षेत्रातील कामगारांपर्यंत पोहचू शकेल. पोर्टलवर नोंदणी झालेल्या कामगारांना बारा अंकी सांकेतांक (Unique Code)  असलेले ई-श्रम कार्ड दिले जाईल.

 

                                                             000

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा