शेतकरी लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांचे ई-केवायसी पडताळणी 31 जुलैपुर्वी पुर्ण करावी -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

शेतकरी लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्राच्या माध्यमातून त्यांचे

ई-केवायसी पडताळणी 31 जुलैपुर्वी पुर्ण करावी

                            -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

लातूर,(जिमाका)दि.22:- राज्यात दिनांक 22 जुलै, 2022 अखेर एकुण 61.33 लाख लाभार्थ्यांचे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी पूर्ण  करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या दिनांक 31 जुलै, 2022 मुदतीपुर्वी पुर्ण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास ( पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रुपये 2 हजार प्रती हप्ता या प्रमाणे तिसऱ्या हप्त्यात रू. 6 हजार प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (डिबीटीद्वारे) जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील 109.97 लाख लाभार्थ्यांना एकुण रक्कम रूपये 20187.04 कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे.

या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी दिनांक 31 जुलै, 2022 पुर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. 

सदरची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी दिनांक 31 जुलै, 2022 पर्यंत पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. 

यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र सीएससी (CSC) मार्फत ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल.

पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/  या लिंकद्वारे ई-केवायसी (e-KYC) करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे ई-केवायसी (e-KYC) पडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी बायोमॅट्रिक (biometric) पद्धतीद्वारे ई-केवायसी  (e-KYC) पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रूपये 15/- प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल.

 

 

0000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु