सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली स्कॉलरशिप’साठी अर्ज 1 ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी
टपाल खात्यातर्फे ‘फिलाटेली
स्कॉलरशिप’साठी
अर्ज 1 ते 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावेत
*लातूर, (जिमाका),दि.20:-*भारतीय टपाल खात्यातर्फे सहावी ते नववीच्या
विद्यार्थ्यांसाठी ‘दीनदयाळ स्पर्श योजना’ या नावाने फिलाटेली स्कॉलरशिप
सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये टपाल तिकिटे जमविणे आणि
तिकिटांचे संशोधन करणे हा छंद निर्माण करण्याचा टपालखात्याचा मानस आहे.
ज्या
विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासला आहे, अशा विद्यार्थ्यांची टपाल खात्यातर्फे
‘फिलाटेली प्रश्नमंजुषा आणि फिलाटेली प्रकल्प’ या आधारावर मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी पी ओ, मुंबई-400001 कार्यालयातर्फे निवड केली जाईल व विध्यार्थ्यांना वार्षिक
सहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
सदर स्कॉलरशिप मध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज
सादर करण्यासाठी 01 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 हा कालावधी असेल. तरी जास्तीत जास्त
विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन डाक अधिक्षक, उस्मानाबाद विभाग
मुख्यालय लातूर डॉ. बी. एच. नागरगोजे
यांच्या कडून करण्यात आले आहे.
आधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 02382-249954 वर संपर्क साधावा असे डाकघर अधिक्षक, उस्मानाबाद विभाग, मुख्यालय लातूर
यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment