महाबीज, सोयाबीन बियाणे आधार कार्ड, सातबारा नुसार वितरीत होणार

 

महाबीज, सोयाबीन बियाणे

आधार कार्ड, सातबारा नुसार वितरीत होणार

 

        *लातूर,दि.6,(जिमाका)* दहा वर्षाआतील महाबीज सोयाबीन MASU-162 MACS-1188 MACS-1281 व  MASU-158 बियाणे सातबारा आधार कार्ड व अनुदान दराने उपलब्ध होणार असल्याची माहिती महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी दिली आहे.

      खरीप 2022 हंगामामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणामध्ये महाबीज सोयाबीन MASU-162 MACS-1188 MACS-1281 व  MASU-158 या वाणाचे बियाणे अनुदानित दराने महाबीज विक्रेत्याकडे सातबारा व आधारकार्डची झेरॉक्स देऊन बियाणे खरेदी करावेत. शेतकऱ्याला सातबाराच्या क्षेत्रानुसार जास्तीत जास्त पाच बॅगा पर्यंत बियाणे अनुदानित दराने खरेदी करता येतील.

        त्यासाठी सोयाबीन MASU-162 MACS-1188 MACS-1281 व  MASU-158, 30 किलोची बॅगची मुळ किंमत रुपये 4 हजार 200 अनुदान रुपये 1 हजार 200 वजा जाता रुपये 3 हजार प्रति 30 किलो बॅगप्रमाणे अनुदानित दराने खरेदी करावे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्य या धर्तीवर बियाणे उपलब्ध असे पर्यंत अनुदानित दराने बियाणे खरेदी करावे. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी लातूर व जिल्हा व्यवस्थापक महाबीज लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                      0000

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु