इतर मागासवर्गीयांच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी विविध कार्ज योजनेचा लाभ घ्यावा

 

इतर मागासवर्गीयांच्या कल्याण, विकास व उन्नतीसाठी

विविध कार्ज योजनेचा लाभ घ्यावा

*-जिल्हा व्यवस्थापक पी.सी.पोहरे यांचे आवाहन*

 

         *लातूर,(जिमाका)दि. 19:-* महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळाच्या लातूर जिल्हा कार्यालयासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी बीजभांडवल योजनेचे 46, थेट कर्ज योजनेचे 120, वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेचे 119, गट कर्ज व्याज परतावा योजनेचे 13 व शैक्षणीक कर्ज व्याज परतावा योजनेचे 11 लाभार्थी करीता भौतिक उद/दीष्ट प्राप्त झाले आहे. योजनांची माहिती व पात्रतेचे निकष यांची माहिती पूढील प्रमाणे आहे.

        बीजभांडवल योजना- सदर योजना राष्ट्रीयकृत बॅंका व जिल्हा मध्यवर्ती बॅंकांच्या माध्यमातुन राबवीण्यात येते. यात महामंडळाचे कर्ज 20 टक्के, बॅंकेचे कर्ज 75 टक्के, व लाभार्थीचा सहभाग 5 टक्के बँक मंजुर कर्ज  रकमेच्या प्रमाणात असतो. कर्ज रक्कम मर्यादा रु.5 लक्ष. कर्ज फेडीची कालमर्यादा 5 वर्षे. व्याजदर महामंडळाच्या सहभाग रकमेवर 6 टक्के व बॅंकेच्या सहभाग रकमेवर प्रचलीत बॅंक व्याज दरानुसार. कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.1 लक्ष पर्यंत. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे.

       थेट कर्ज योजना- सदर योजना महामंडळामापर्फत राबवण्यात येते. कर्ज मर्यादा रु. 1 लक्ष, अर्जदाराचा सिबील स्कोअर किमान 500 इतका असावा. वय 18 ते 55 वर्षे. परत फेडीचा कालावधी 4 वर्षे.  नियीमत कर्ज परतफेड  करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारले जाणार नाही. (हप्ता मासीक रु.2085) तथापी थकीत कर्ज रकमेवर 4 टक्के व्याज आकारले जाईल.

       वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना- सदर योजना बॅंके मापर्फत राबवीण्यात येते. कर्ज मर्यादा रफ.10 लक्ष. महामंडळाच्या वेबपोर्टल संगणक प्रणालीवर नांव नोंदणी अनिवार्य. कुटुंबाची वार्षीक उत्पन्न मर्यादा रु. 8 लक्ष पर्यंत. कर्ज परतपफेडीचा कालावधी बॅंक निकषानुसार. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजपरतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थीच्या आधार  लिंक खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. पात्र लाभार्थीस L.O.I.  दिले जाईल त्या आधारे बॅंकेकडुन कर्ज मंजुर करुन घ्यावे लागेल.

        गट व्याज परतावा योजना- सदर योजना बॅंके मापर्फत राबवीण्यात येते. महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षीक उत्पन्न मर्यादेतील बचतगट भागीदारी / सहकारी संस्था शासन प्रमाणीत. कर्ज मर्यादा रफ.10 लक्ष ते 50 लक्ष. महामंडळाच्या वेबपोर्टल / संगणक प्रणालीवर नांव नोंदणी अनिवार्य. गटातील लाभार्थींचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य. गटातील लाभार्थीचे वय 18 ते 45 वर्षे. गटातील लाभार्थींनी  यापुर्वी महामंडळाच्या वा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनांचा लाभ घेतलेला नसावा. गटातील सर्व सदस्यांचा सिबील स्कोअर किमान 500 असावा. कर्ज परतपफेडीचा कालावधी 5 वर्षे वा कर्ज कालावधी या पैकी जो कालावधी कमी असेल तो. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजपरतावा रक्कम महामंडळ नियमानुसार लाभार्थीच्या आधार लिंक खात्यात दरमहा जमा करण्यात येईल. पात्र गटास L.O.I.   दिले जाईल त्या आधारे बॅंकेकडुन कर्ज मंजुर करफन घ्यावे लागेल.

           शैक्षणीक कर्ज व्याज परतावा योजना- सदर योजना बॅंकेमार्फत राबवण्यात येते. बॅंक कर्ज रकमेवरील व्याज परतावा. देशांतर्गत व परदेशी उच्च शिक्षणासाठी रफ.10 लक्ष व 20 लक्ष पर्यंत अनुक्रमे. विद्यार्थीचे वय 17 ते 30 वर्षे.अर्जदाराची कौटुंबीक वार्षीक उत्पन्न मर्यादा रु.8 लक्ष. अर्जदार 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. देशांतर्गत अभ्यासक्रम: 1.आरोग्य विज्ञान, 2.अभियांत्रीकी, 3.व्यावसायीक व व्यवस्थापन, 4.कृषी, अन्नप्रक्रीया व पशुविज्ञान. परदेशी अभ्यासक्रम: 1.आरोग्य विज्ञान, 2. अभियोत्रीकी, 3. व्यावसायीक व व्यवस्थापन, 4.विज्ञान, कला. बॅंकेने उपलब्ध करफन दिलेल्या कर्जामध्ये पफक्त शैक्षणीक शुल्क, पुस्तके व साहीत्य खरेदीचा सामावेश राहील. परदेशी अभ्यासक्रमांसाठी QS रॅंकींग 200 च्या आतील व  GRE, TOEFL परिक्षा उत्तीर्ण.

          पात्रतेचे निकष- लाभार्थी महाराष्ट राज्याचा इतर मागासवर्गीय रहीवासी असावा. तो महामंडळाचा, बॅंकेचा अथवा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्याचे त्याला ज्ञान किंवा अनुभव असावा. उत्पन्नाच्या दाखल्याचे प्रमाणपत्र. जात, रेशनकार्ड, आधारकार्ड, व्यवसाय स्थळाची भाडे पावती करारनामा. व्यवसायास आवश्यक परवाने लायसन्स महामंडळाने वेळोवेळी निर्देशीत केलेल्या कागदपत्रांचा तपशील.

          योजनांच्या अधिक माहीती व इतर तपशीलासाठी महाराष्ट्र  राज्य इतर मागासवर्गीय वित आणि विकास महामंडळ म., पहिला मजला, जात पडताळणी इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी गेट समोर, गुळ मार्केट, लातुर या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

 

                                                   000

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु