अभय योजना- 2022 अंतर्गत मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या दंडाचा लाभ 31 जूलै 2022 पर्यंत घेण्यात यावा

 

अभय योजना- 2022 अंतर्गत मुद्रांक शुल्कावर आकारण्यात येणाऱ्या दंडाचा लाभ

31 जूलै 2022 पर्यंत घेण्यात यावा

 

*लातूर,दि.27(जिमाका):-*  1 एप्रिल 2022 पासून सूरु झालेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील पहिला टप्पा दिनांक 01 जुलै 2022 रोजी संपत आहे. तरी थकीत मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती या संबंधी पक्षकारांना दिनांक 31 मार्च 2022 पुर्वी नोटीस प्राप्त झालेल्या असतील व त्यांनी अद्याप या योजनेचा फायदा घेतला नसेल तर त्या संबंधीत पक्षकारांनी तात्काळ या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ध.ज.माईनकर, सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांनी केले आहे.

संबंधीत पक्षकारांनी दि.31 जूलै 2022 रोजीपर्यंत मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा लाभ घेतल्यास सदर सवलतीच्या पहिल्या टप्प्याचा म्हणजेच थकीत शास्तीवरील 90% सवलतीचा लाभ मिळेल अन्यथा सदर पक्षकारांना दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकीत शास्तीवर 50%दंड भरावा लागेल.

योजनेचे संक्षिप्त स्वरूप :- महाराष्ट्र  मुद्रांक अधिनियम 31, 32 अ, 33, 33 अ , 46, 53 (1अ), व 53 अ अन्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात दिनांक 31 मार्च 2022 रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्या पक्षकारांकरिता सदर माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर योजना ही दिनांक 01 एप्रील 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत (08 महीने) कार्यान्वित राहणार आहे. सदर माफी योजना ही मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहे.

1एप्रील 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क्‍ व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाच्या रक्कमेत 90 % सुट मिळेल. 01 ऑगस्ट 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापुर्वीच भरले असल्यास दंडाच्या रक्कमेत 50 % सुट मिळेल.

तसेच दि.30 जूलै 2022 व 31 जूलै 2022 रोजी अनूक्रमे 5 वा शनीवार व रविवार या दिवशी थकीत मुद्रांक शुल्काच्या दंडातील असलेल्या सवलतीचा जनतेला लाभ होण्याकरीता सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग-2 व सर्व दुय्यम निबंधक श्रेणी-1 कार्यालय तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय लातूर उघडे ठेवण्यात येत आहे असे सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

 

                                                     0000

 

 

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा