जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022 सुधारित कार्यक्रम जाहीर

 

जिल्हा परिषद त्याअंतर्गत असलेल्या

सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022 सुधारित कार्यक्रम जाहीर

 

लातूर,दि.25,(जिमाका):- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे दिनांक 22 जुलै, 2022 आदेशान्वये दिलेल्या कार्यक्रमांनुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद त्याअंतर्गत असलेल्या सर्व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2022 साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती ,नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखुन ठेवावयाच्‍या जागा आणि उर्वरीत स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यानुसार  आरक्षण सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे राबविण्यात येत आहे.  

जिल्‍हा परिषदेचे नांव / पंचायत समितीचे नांव, सभेची वेळ तारीख, सभेचे ठिकाण, आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्‍द करण्याच्या दिनांक आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी / संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती सुचना सादर करण्याचा कालावधी पूढीलप्रमाणे आहे.

            दिनांक 28 जुलै, 2022 रोजी लातूर जिल्हा परिषद सभेची वेळ दुपारी 12-00 वाजता सभेचे ठिकाण डी. पी. डी.सी. हॉल, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे. अहमदपूर पंचायत समिती सभेची वेळ  12-00 वाजता सभेचे ठिकाण तहसील कार्यालय अहमदपूर येथे. जळकोट  पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 12-00 वाजता तहसील कार्यालय, जळकोट येथे. उदगीर पंचायत समिती दुपारी 3-00 वाजता तहसील कार्यालय, उदगीर येथे. देवणी पंचायत समिती सभेची वेळ सकाळी 11-00 वाजता तहसील कार्यालय, देवणी येथे. शिरुर अनंतपाळ पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 12-00 वाजता सभेचे ठिकाण तहसील कार्यालय शिरुर अनंतपाळ येथे. चाकूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 12-00 वाजता पंचायत समिती सभागृह, चाकूर येथे. रेणापूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 3-00 वाजता तहसील कार्यालय, रेणापूर येथे. लातूर पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 12-00 वाजता जुन्या डी. पी. डी. सी. सभागृह, प्रशासकीय इमारत, छत्रपती शिवाजी चौकाजवळ लातूर येथे. औसा पंचायत समिती सभेची वेळ सकाळी 11-00 मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील, मिटींग हॉल, औसा येथे. निलंगा पंचायत समिती सभेची वेळ दुपारी 3-00 वाजता तहसील कार्यालय येथे सभेचे ठिकाण असणार आहे.

आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याच्या दि. 29 जुलै, 2022, आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी / संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती सुचना सादर करण्याचा कालावधी दिनांक 29 जुलै, 2022 ते 2 ऑगस्ट, 2022 कालावधी असणार आहे. जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील ज्या रहिवाशांची आरक्षण सोडतीच्या सभेस हजर राहण्याची इच्छा आहे. त्यांनी वरील ठिकाणी वेळेत हजर रहावे.

 

त्याचप्रमाणे मा. राज्य निवडणूक आयोगाचे आदेश दिनांक 22 जुलै, 2022 अन्वये लातूर जिल्ह्यातील 352 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहणार आहे.

आरक्षणाची सोडत - रोजी विशेष ग्रामसभेची सूचना देणे (आरक्षणाची सोडत काढण्याकरिता) कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 26 जुलै, 2022 रोजी.

विशेष ग्रामसभा बोलवून, तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली, प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणे ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक दिनांक 29 जुलै, 2022 रोजी. सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 1 ऑगस्ट, 2022 रोजी. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी दिनांक 1 ऑगस्ट, 2022 ते 3 ऑगस्ट, 2022 रोजी, उपविभागीय अधिकारी यांनी प्राप्त हरकती विचारात घेवून अभिप्राय देणे कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट, 2022 रोजी. उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेवून अंतिम अधिसुचनेस ( नमुना -अ) जिल्हाधिकारी यांनी मान्यता देणे दिनांक 12 ऑगस्ट, 2022 रोजी. जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला ( नमुना -अ) व्यापक प्रसिध्दी देण्याचा दिनांक 17 ऑगस्ट, 2022 रोजी. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीच्या ग्रामसभेच्या कार्यक्रमावेळेस संबंधित ग्रामस्थांनी उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे .

****

 



Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा