साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे
साहित्यरत्न
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडे
अनुदान व कर्जाकरीता अर्ज करावे
*लातूर,दि.29,(जिमाका),:-*साहित्यरत्न
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत मातंग समाजातील मांग, मातंग व 12 पोट
जातीतील सुशिक्षित बेरोजगार, महिला व पुरुषांनी महामंडळाकडे अनुदान व कर्ज मिळणे करीता
अर्ज करावेत.
सन 2022-23 या आर्थिक वर्षात शासनाकडून उद्दिष्ट
अनुदान योजने अंतर्गत 150 व 20 टक्के बीजभांडवल योजने अंतर्गत 50 उद्दिष्ट प्राप्त
झाले आहेत.जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकाना उद्दिष्ट वितरण जिल्हा अग्रणी बँकेकडून
व महामंडळाकडून वितरण झालेले आहे.
सन 2022-23 मधील सर्व मातंग समाजातील अर्ज
केल्यानंतर जेष्ठतेनुसार त्या-त्या दतक बँकेला अर्ज मंजुरी करिता पाठविण्यात येईल बँकेने
अर्ज मंजुर केल्यानुसार महामंडळकाडून अनुदान व कर्ज लगेच वितरण करण्यात येईल.
या करीता पात्र अर्जदारांनी साहित्यरत्न लोकशाहिर
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शिवनेरी
गेट समोर, लातूर येथे अर्ज करावेत व अर्ज विनामुल्य राहील असे जिल्हा व्यवस्थापक यांनी
एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
000
Comments
Post a Comment