प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत गुळ उद्योग,दाळ उद्योग, तेल उद्योग इ.अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी अर्ज करावेत
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतंर्गत
गुळ उद्योग,दाळ उद्योग, तेल उद्योग इ.अन्न प्रक्रिया प्रकल्पासाठी
अर्ज करावेत
*लातूर,दि.21(जिमाका):-*केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने लातूर जिल्हयासाठी ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षात राबविली जाणार आहे.
सदर योजना सन 2022-23 अंतर्गत लातूर जिल्हयातील सद्या चालू असलेले गुळ उद्योग, दाळ उद्योग, तेल उद्योग तसेच नव्याने स्थापित करावयाचे गुळ उद्योग, दाळ उद्योग,तेल उद्योग इ. यांच्या नविन स्थापना, आधुनिकीकरण, विस्तारीकरण,नुतणीकरण इ.साठी बँक कर्जाशी निगडीत प्रकल्पास एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के अनुदान जास्तीत जास्त रु.10 लाख रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय आहे.
सदर अनुदानासाठी वैयक्तीक लाभार्थी, गट लाभार्थी, शेतकरी उत्पादक कंपनी या पैकी कोणत्याही प्रकारच्या लाभार्थ्यास अनुदान देय आहे.
तरी इच्छुक लाभार्थ्यानी अर्ज भरण्याकरीता https://pmfme.mofpi.gov.in
या वेबसाईटचा वापर करावा. तसेच आपल्या तालूक्याचे तालूका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी,लातूर यांनी केले आहे.(अधिक माहितीसाठी
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर कार्यालयातील
तंत्र सहाय्यक श्री. बालकुंदे व्ही.एम. मो.नं.9823238338 यांच्याशी संपर्क करावा.)
00000
Comments
Post a Comment