केंद्रीय सामजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा

 

केंद्रीय सामजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री

रामदास आठवले यांचा लातूर जिल्हा दौरा

 

           लातूर,दि.11 (जिमाका):-केंद्रीय सामजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे दिनांक 12 जुलै, 2022 रोजी लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे राहील.

             मंगळवार, दिनांक 12 जुलै, 2022 रोजी 10-30 वाजता हैद्राबाद विमानतळ येथून बीदरमार्गे उदगीरकडे प्रयाण. दुपारी 2-15 वाजता शासकीय विश्रामगृह, उदगीर येथे आगमन व तेथे आयोजित सामाजिक न्याय विभागाच्या बैठकीसाठी उपस्थिती. दुपारी 4-00 वाजता शासकीय विश्रामगृह उदगीर येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. 4-30 वाजता उदगीर येथील उदय पेट्रोलपंपाजवळ, राज नगर येथे श्री. देविदास कांबळे यांच्या निवासस्थानी सौजन्य भेट. 5-00 वाजता उदगीर येथील नळेगाव रोड ललीत भवन मंगल कार्यालयात आयोजित नागरिकांच्या बैठकीस उपस्थिती. विश्रामगृह , उदगीर येथे राखीव, रात्री 10-30 वाजता रेल्वेनी मुंबईकडे प्रयाण.

 

                                                       ****

Comments

Popular posts from this blog

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु

शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा सर्वंकष माहितीकोष 2024 करिता माहिती सादर करण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे आणि लक्ष्मण सोपान हाके यांचा दौरा