सन 2022-23 साठी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

सन 2022-23 साठी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

*लातूर,(जिमाका),दि.13:-* सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये मुलांची 13 व मुलींचे 12 असे एकुण 25 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. सदर वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने होणार असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी http://www.hostel.mahasamajkalyan.in या लिंकचा वापर करुन विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक,रिक्त जागेचा तपशिल,प्रवेशासाठी नियम,अटी व शर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरु शकतात.  प्रवेश अर्ज भरण्याकरिता जिल्ह्यात इ.आठवी व आकरावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी,पद‍विका प्रथम वर्षात,पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल.

तेंव्हा शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपरोक्त लिंक चा वापर करुन तसेच स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे संपर्क साधुन प्रवेश अर्ज भरावेत असे  आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण एस.एन.चिकुर्ते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

       टिप :-ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Google Chrome च्या लेटेस्ट व्हर्जनचाच वापर करावा, वरील लिंक Google वर ओपन होत नसल्यास सदर लिंक ब्राउझरच्या URL बारमध्ये टाइप करुन  घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाचे गुण ग्रेड सिस्टीममध्ये असतील त्यांनी संबंधीत शाळा/महाविद्यालयाकडून ग्रेड मधील गूण अंकामध्ये करुन घ्यावे व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरावा.

                                                         000

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

योजना ‘सारथी’च्या... ‘सारथी’कडून मिळते संघ लोकसेवा आयोग परीक्षेचे मोफत प्रशिक्षण

‘नाफेड’मार्फत मूग,उडीद व सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी सुरु