धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये शिक्षण देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे
धनगर
समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये शिक्षण देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे
*लातूर,दि.5,(जिमाका)-*महाराष्ट्र
शासनाच्या इतर मागास बहूजन कल्याण विभागामार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील
इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात
आलेले असून सदर योजनेमध्ये लातूर जिल्ह्यातील जयहिंद पब्लिक स्कुल उदगीर, महात्मा फुले
पब्लिक स्कुल, कुणकी रोड जळकोट, बिर्ला ओपन माईडंस इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल उदगीर या
तिन शाळेची निवड झालेली आहे.
सदर शाळेमध्ये
या योजनेतील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासन निर्णय दिनांक 4 सप्टेंबर 2021 अन्वये देण्यात
आलेल्या सोई-सुविधा मोफत उपलब्ध असून
सदर शाळेत या योजनेतंर्गत अर्ज करण्या करीता
दि. 11 जूलै 2022 पर्यंत प्रवेश
घेणेकरिता सहायक आयुक्त समाज कल्याण लातूर
या कार्यालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज
करण्यात यावेत. अर्ज सहायक
आयुक्त,समाज कल्याण लातूर या कार्यालयात तसेच
लातूर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील
शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी श्रीमती. प्रणिता सुर्यवंशी यांचे भ्रमनध्वनी नंबर 7972535516 संपर्क करावा.
सदर योजनेतंर्गत उपरोक्त शाळेमध्ये प्रवेश
घेण्याकरीता पूढील कागदपत्रांची आवश्यकता आहे. सदर योजनेकरिता विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी मध्ये
शिक्षण घेणारा असावा, विहित नमुन्यातील अर्ज (या कार्यालयात तसेच तालुकास्तरीय शासकीय वसतीगृहात उपलब्ध आहेत), जातीचा दाखला, जन्माचा दाखला, पालकाचे उत्पन्न (एक लाखाचे आत असावे) सदर
अटीची पुर्तत: करत असलेल्या धनगर समाजातील
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण शिवकांत चिकुर्ते
यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
Comments
Post a Comment