जिल्हा क्रीडा संकुल येथे खो-खो या खेळाच्या मोफत सरावासाठी मुले / मुली पाठविण्याचे आवाहन
जिल्हा
क्रीडा संकुल येथे खो-खो या खेळाच्या मोफत
सरावासाठी मुले / मुली पाठविण्याचे आवाहन
*लातूर,दि.7,(जिमाका)* जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे
खो-खो या खेळाचे मोफत प्रशिक्षण नियमित चालू असून सदर प्रशिक्षणासाठी आपल्या
शाळेतील / महाविद्यालयातील खो-खो या खेळाचे खेळाडू दररोज सरावासाठी मुले / मुली
पाठविण्यात यावेत असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये खेळाडूंना तज्ञ
क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर खेळाडूंना वर्षातून एक वेळेस
ट्रॅकसुट, खेळाची किट व शुज देण्यात येणार आहे. तरी आपल्या शाळेतील /
महाविद्यालयातील जास्तीत जास्त खेळाडू सरावासाठी पाठविण्यात यावे असे आवाहन जिल्हा
क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा
मार्गदर्शक (खो-खो) चंद्रकांत काशिनाथ लोदगेकर, यांच्याशी संपर्क साधावा.मो.नं.
9420292155 असे जिल्हा क्रिडा अधिकारी
लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
Comments
Post a Comment